Gevrai

महाराष्ट्र दिनाचे ‘औचित्य’ साधून.. ‘बजरंग गु्प’ कोरोना रुग्णांच्या सेवेत..

महाराष्ट्र दिनाचे ‘औचित्य’ साधून..
‘बजरंग गु्प’ कोरोना रुग्णांच्या सेवेत..

गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या तीन कोरोना सेंटरवरील रुग्णांसाठी ‘मोफत पिण्याच्या पाण्याची’ व्यवस्था ‘बजरंग ग्रुप’ च्या वतिने करत आहे, या अनुषंगाने सामाजिकतेच्या ध्येय निश्चितीतून ‘समाधान’ देणारा हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष सुभाष मुळे यांनी दिली.
गेवराई तालुक्यात कोरोनोच्या ‘विषाणू’ने थैमान घातले आहे. अशा अडचणीच्या काळात माणुसकी दर्शविणे गरजेचे वाटते. या अनुषंगाने रुग्णांना अंतर्गत काही सहाय्य करता येईल का ? या बाबीवर शुक्रवार, दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या महत्वपुर्ण बैठकीत ‘बजरंग गु्प’ च्या सर्व सन्माननीय सदस्यांनी रूग्णांसाठी आपले ‘अर्थपुर्ण’ योगदान देऊन मोफत पिण्याच्या पाण्याची’ व्यवस्था आज महाराष्ट्र दिनाचे ‘औचित्य’ साधून करणार आहे.
याकामी समन्वयक सखाराम कानगुडे तसेच शिवाजी खिंडकर, नारायण पवार, डाॅ. गणेश मोटे, शिवाजी शिंदे, गोपालसेठ जाकिटे, नारायण पवार, भास्कर सुरवसे, रामकिसन मोटेे आदिंसह सर्व सन्माननीय सदस्य परिश्रम घेत आहेत.

***

¶¶

Leave a Reply

Back to top button