Mumbai

Maharashtra Budget Session 2021-22 Live: Day 3…विधानसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब..!OBC आरक्षणावर मार्ग..!

Maharashtra Budget Session Live: Day 3…विधानसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब..!OBC आरक्षणावर मार्ग..!

अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या आठवड्यात सभागृहात दोन दिवस कामकाज झाले. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष होताना दिसला. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडीला लक्ष्य केले. हा विरोध आणि आगामी काळातील महानगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता महाविकासआघाडी सरकारने आता ओबीसी आरक्षणासाठी नवा कायदा अंमलात आणण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सोमवारी विधानसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे. या कायद्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा ठरवणे, प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारला मिळणार आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्यादृष्टीने नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची वाट सुकर होईल. तर दुसरीकडे विधानसभेत भाजपकडून आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरला जाऊ शकतो. त्यामुळे महाविकासआघाडी या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांच्या टीकेचा सामना कशाप्रकारे करणार, हे पाहावे लागेल. याशिवाय, येत्या ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात सभागृहात अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दिशा सालियन प्रकरणावरून राणे पिता-पुत्रांची पोलिसांकडून झालेली चौकशी, फोन टॅपिंग प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरूनही सभागृहात वाद रंगण्याची शक्यता आहे.

Live Updates:

 • विधानसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब
 • मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक एकमताने मंजूर
 • बीडच्या एसपींना तातडीने रजेवर पाठवणार, दरम्यानच्या काळात चौकशी होणार, देवेंद्र फडणवीसांच्या तीव्र आक्षेपानंतर गृहमंत्र्यांची सभागृहात घोषणा
 • सर्वपक्षीय आमदारांनी केलेल्या तक्रारींचा विचार करुन गृहमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.
 • बीडच्या पोलीस अधीक्षकांचं तत्काळ निलंबन करा, भाजप आमदार अत्यंत आक्रमक
 • या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांशी मी बोललो. जेव्हा पाणी द्यायची वेळ असते तेव्हा त्याच्या शेतातील वीज तोडण्यात आली. अशा प्रकारे रोज आपण शेतकऱ्यांची वीज तोडणी करतोय. एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि अनेकांची तशीच अवस्था: फडणवीस
 • बीडचा बिहार झालाय, राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्या सरकारलाच घेरलं
 • शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून भाजप सभागृहात आक्रमक

नाना पटोले यांचे सरकारला खडेबोल. मंत्रिमहोदय उत्तर देतायेत, की कंपनीची जाहिरात करतायेत हे कळत नाही. कृषी पंपाबाबतचा हा प्रश्न होता. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना टोला.

 • माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रविण आष्टीकर आणि पोलीस आयुक्त आरती सिंग यांचे निलंबन करा: आमदार रवी राणाविधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
 • ओबीसी आरक्षण विधेयकावरील बैठक संपली
 • नवाब मलिक राजीनामा प्रकरणावरुन भाजपचा पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा, थोड्याच वेळात कामकाजाला सुरुवात होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीकडे लक्ष
 • राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी विधेयक मांडल्यास पाठिंबा देऊ, पण कोणताही खोटारडेपणा करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
 • नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
 • महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांची ओबीसी आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर बैठक
 • विरोधी पक्ष ओबीसी आरक्षणासाठी सहकार्य करायला तयार: भुजबळ
 • ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नवा कायदा आणणार, प्रभाग पुर्नरचनेमुळे इम्पेरिकल डेटा गोळा करायला वेळ मिळेल: छगन भुजबळ
 • मध्य प्रदेशात निवडणूक आयोगाचं भाजप सरकारला सहकार्य, महाराष्ट्रात थोडेफार अडथळे आहेत: छगन भुजबळ
 • थोड्याचवेळात महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची बैठक होणार
 • थोड्याचवेळात अधिवेशनाच्याकामकाजाला सुरुवात
 • ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार विधेयक मांडणार, आजच चर्चा होऊन मंजुरी मिळण्याची शक्यता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button