Aurangabad

धोंदलगावात साध्या पध्दतीने महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

धोंदलगावात साध्या पध्दतीने महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे प्रतीवर्षी महाराणा प्रतापसिंह जयंती किर्तन आणी व्याख्यान आयोजित करून मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता या वर्षी साहित्यिक बाबासाहेब चन्ने यांच्या निवासस्थानी महाराणा प्रतापसिंह जयंती अगदी साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली असून कोटीसम्राट ह.भ.प. हरिनाथ महाराज ढंगारे यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्याप्रसंगी प्रामुख्याने धोंदलगाव ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच, विद्यमान सदस्य तथा शिवसेनेचे नेते काकासाहेब कुभांडे, ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अहिलाजी पा. डमाळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डाॅ. विपीन साळे, जि.प. शाळेचे मा. अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, साहेबराव चन्ने, संस्कारसिंह चन्ने यांची उपस्थिती होती.
उपस्थितांना डाॅ. अर्चना पाटील लिखित मृगजळ हा कविता संग्रह बाबा चन्ने यांच्या तर्फे भेट देण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button