Amalner

शिक्षणमहर्षी स्मृतीशेष आबासो.व.ता पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ महाआरोग्य शिबिर संपन्न

शिक्षणमहर्षी स्मृतीशेष आबासो.व.ता पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ महाआरोग्य शिबिर संपन्न

अमळनेर : अमळनेरात ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून स्मृतीशेषआबासो. व.ता. पाटील यांनी शिक्षणसंस्था उघडली. मागील वर्षी त्यांचे फुफ्फुसाच्या संसर्ग आजाराने देहवसान झाले. त्यांची स्मृती कायम जतन व्हावी म्हणून जयऋतूकमल हॉस्पिटल व आय. सी. यु नवी मुंबई संचलित मोरया मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल,अमळनेर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रविण मुंडे साहेब (IPS) पोलीस अधीक्षक ,जळगाव यांच्या कृतिशील करकमलांनी करण्यात आले. शिबिरात विविध आजारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ह्दयरोगतज्ञ डॉ. श्रीकांत वसंतराव पाटील, डॉ. ज्योती श्रीकांत पाटील मधुमेहतज्ञ, डॉ.दिनेश सी. महाजन स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रतज्ञ डॉ.दीपक विजय धनगर, फुफ्फुस विकार तज्ञ, डॉ.पंकज चौधरी शल्यचिकित्सक तज्ञ यांनी रुग्णांची मोफत तपासणी व उपचार कामी औषधी सुद्धा मोफत देऊन आरोग्याबाबत अमळनेर शहरात जनजागृती करण्यात आली.

आरोग्य शिबिरासाठी प्रत्यक्ष तपासणीकामी किशोर पाटील अॅपरिका लॅब , प्रवीण बावस्कर सन फार्मा ,संदीप भालेराव (लॅब),आकाश माळी, धनंजय भदाणे, नंदिनी राजपूत हे मोरया हॉस्पिटल सहकारी व त्यांच्या स्टाफ, जयरऋतूकमल
हॉस्पिटल मुंबई स्टाफ,स्रियांच्या तपासणीसाठी डॉ. अश्विनी महाजन या उपस्थित होत्या.

या शिबिर यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय दोधवद ता. अमळनेर ,माध्यमिक विद्यालय हिंगोणा ता.चोपडा ,माध्यमिक विद्यालय भोणे ता. धरणगाव तसेच ना झी. पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
या शिबिरासाठी विशेष परिश्रम स्व.व.ता.आबा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतले. या शिबिराचा लाभ एकूण ६००हून अधिक लोकांनी घेतला त्यात हृदयरोग ,मधुमेह, स्रीरोग,फुफ्फुसविकार ,आतड्याचे रोग यांचे संदर्भात तपासण्या झाल्या. भविष्यातही अशा स्वरूपाचे भव्यदिव्य महाशिबिरे आयोजित करण्याचा या संस्थेचा मानस आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button