Jalgaon

मनसेच्या कार्यालयात महाआरोग्य शिबिर संपन्न…

मनसेच्या कार्यालयात महाआरोग्य शिबिर संपन्न…

नशिराबाद आज दिनांक 16 /11/ 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने नशिराबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर महाआरोग्य शिबिराचे आयोजत केले होते शिबिर सुरू होण्या पूर्वी सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आलं शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी ,हृदयाची तपासणी, स्त्रियांचे आजार ,गुडघ्याचे आजार ,हाडांचे आजार ,मेंदूचे आजार तसेच ऍन्जिओग्राफी, कार्डिओग्राम, व त्वचेचे आजार तसेच कॅन्सर चे आजार या सर्व आजारांचे या ठिकाणी तपासणी करून येणाऱ्या 22 तारखेला सर्व व्याधींचे उपचार केले जाणार आहे तसेच शस्त्रक्रिया केली जाणार आहे त्यात एकूण 267 याठिकाणी तपासण्या करण्यात आल्या त्यात पंधरा हृदय विकार शस्त्रक्रिया व 32 मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया याठिकाणी करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी एडवोकेट जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष मनसे मुकुंद रोटे, जिल्हाध्यक्ष मनसे तसेच कमलाकर घारू, जिल्हाध्यक्ष मनसे केतकी ताई पाटील, सदस्य गोदावरी फाऊंडेशन तसेच गोदावरी फाउंडेशन चे सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी केली तर अध्यक्षीय भाषण एडवोकेट जमील देशपांडे यांनी केलं सूत्रसंचालन श्री राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले तर आभार जितू बराटे यांनी मानले कार्यक्रमासाठी जितेंद्र बराटे, गजानन माळी ,सचिन भालेराव, रवींद्र रोकडे, विजय वले, हेमराज वाघूरदे,अमोल माळी, तुषार पाटील, संतोष भोई, रितेश महाजन, गोकुळ धनगर, प्रतिभा रोटे, प्रवीण माळी, योगेश सपके, सागर मगरे, गोपाल भारुडे, तसेच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व त्यांचे सर्व टीम यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button