Pandharpur

माघ एकादशीच्या दिवशी पंढरीत सन्नाटा पंढरीत संचार बंदी ला उत्तम प्रतिसाद

माघ एकादशीच्या दिवशी पंढरीत सन्नाटा
पंढरीत संचार बंदी ला उत्तम प्रतिसाद

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : माघी एकादशीनिमित्त गजबजून जाणारी विठ्ठलाची पंढरी आज शांत आणि सामसुम असून संचारबंदीची कडक अमलबजावणी सुरु झाली आहे, एकादशीच्या दिवशी आज विठ्ठलाचे तर नाहीच पण कळसाचे दर्शनही घेता येणार नाही. वर्षभरापासून कोरोनाने जगणे कठीण केले असताना देवालाही बंदिस्त करून टाकले आहे, पंढरीच्या तीन प्रमुख यात्रा भाविकाविनाच साजऱ्या झाल्या असताना आजची माघी वारीही अशीच सुनी सुनी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री बारा वाजल्यापासून पंढरीत संचारबंदी लागू झाली असून भाविकांऐवजी आज रस्त्यावर फक्त पोलीस दिसत आहेत आणि माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना परत पाठविण्यात आले आहे. माघी एकादशीची विठ्ठलाची पूजा मंदिर समितीच्या सदस्या माधवी निगडे यांच्या तर रुक्मिणी मातेची पूजा समिती सदस्य हभप ज्ञानेश्वरमहाराज जळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मंदिर फुलांनी सजले आहे, आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे पण भाविकांविना अवघा सन्नाटा पसरला असल्याचा दिसत आहे. आज माघी एकादशीचा सोहळा असला तरी कळसाचेही दर्शन मिळणार नाही . संचारबंदी घोषित केल्याने प्रशासन अलर्ट असून नागरिकांनीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. परगावचे भाविक पंढरीत येऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हा, तालुका आणि शहर अशी त्रिस्तरीय नाकाबंदी केली आहे. शहरातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविक आणि स्थानिक नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासंच्या वतीने करण्यात आले आहे.

मंदिर समितीने केली अशी आरास

माघी वारीतील एकादशीचा आजचा दिवस असतानाहीपंढरपूर शहर आणि चंद्रभागेत सन्नाटा पसरलेला दिसत आहे. भल्या पहाटेपासून भाविक चंद्रभागा स्नानासाठी गर्दी करीत असतात त्यामुळे अवघी चंद्रभागा फुलून जात असते पण आज मात्र केवळ सामसूम आणि शांतता दिसत आहे. आज पंढरपूर शहरही बंदच असल्यामुळे आणि भाविकही नसल्यामुळे माघी एकादशीच्या दिवशी अवघी पंढरी सुनी सुनी वाटू लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button