Nashik

खेरवाडी( C.R )रयत शिक्षण संस्था हायस्कूलला पाच व्हाईट बोर्ड आजी आजोबा च्या स्मरणार्थ सप्रेम भेट.

खेरवाडी( C.R )रयत शिक्षण संस्था हायस्कूलला पाच व्हाईट बोर्ड आजी आजोबा च्या स्मरणार्थ सप्रेम भेट.

नाशिक शांताराम दुनबळे.
नासिक = प्रिसाईज व्याक्युम प्रा. लि. नासिक (अंबड ) या कंपनीच्या वतीने व्यवस्थापक संजय शेजवळ यांनी त्यांच्या आजी-आजोबांच्या स्मरणार्थ खेरवाडी येथील रयत शिक्षण संस्थेची भागशाळा स्व. शेठ मानकचंद मणियार विद्यालयास पाच मोठे व्हाईट बोर्ड देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागून आनंद व एकाग्रतेने शिक्षण घेण्यासाठी शिक्षण विभाग व तज्ञ वेगवेगळे प्रयोग करत आहे .ग्रामीण भागात पहिलीपासून काळा फळा व पांढरा खडू हीच संकल्पना रुजुवत आहे .फळा पुसताना खडूच्या उडणाऱ्या धुळीने विद्यार्थी व शिक्षकांना श्वसनाचा होणारा त्रास म्हणजे सहन होत नाही आणि सांगू शकत नाही अशीच बाब आहे .या गोष्टीचा विचार करून अध्ययन व अध्यापनास एक नवीन बदल करण्याच्या हेतूने, शिक्षण क्षेत्राची जवळीक असलेले शिक्षण प्रेमी आजी स्व. शालिनी शंकर शिंदे व आजोबा स्व. शंकर शिवराम शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्यवस्थापक संजय शेजवळ यांनी पाच व्हाईट बोर्ड सह विविधरंगी मार्कर बॉक्स व डस्टर शाळेला सप्रेम भेट दिल्याने, न्यू इंग्लिश स्कुल चांदोरी चे प्राचार्य सोमवंशी सर, ज्ञान विकास मंडळाचे अध्यक्ष सतीश मणियार ,उपाध्यक्ष बबन लांडगे, सरचिटणीस भाऊसाहेब लगड,तसेच शाळा व्यवस्थापक. समिती चे अध्यक्ष अँड श्री लक्ष्मण लांडगे ,उपाध्यक्ष श्री विलास पाटील, इतर सदस्य मंडळ सह शिक्षक मोरे, काळे,पालक पत्रकार बाळासाहेब आहेर,विजय केदारे यांचे विद्यार्थ्यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button