Amalner

?️ कोरोना अपडेट..मा आमदार शिरीष चौधरी उतरले पूर्ण तयारीनिशी कोरोना युद्धात

मा आमदार शिरीष चौधरी उतरले पूर्ण तयारीनिशी कोरोना युद्धात….
मा.आ.चौधरी परिवारातर्फे संपूर्ण शहर निर्जंतुकिकरण व कॉरनटाईन सेंटरला भोजनासह गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अमळनेर शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना मा आ शिरिषदादा चौधरी यांनी मतदार संघात निर्जंतुकिकरणा साठी मोठ्या खर्चातुन फवारणी यंत्रे आणली आहेत.
दहा फूट उंच व आजू बाजूस 20 फूट पर्यंत फवारणी करण्याची क्षमता असलेले हे यंत्र आहेत. .संपूर्ण विभागात असे मशीन नाही हे विशेष! पहिल्या टप्प्यात 1000 लिटर रसायन आणले आहे.
आज 10 वाजे पासून शहरात फवारणी सुरू होणार असून कर्मचारी वर्ग ते संपूर्ण नियंत्रण व खर्च हिरा उद्योग समूह करणार आहे. या सोबतच कोरनटाइन सेंटरला 200 लोकांसाठी भोजन तसेच गरम पाण्या साठी वॉटर हिटर असलेले फिल्टर देण्यात येत आहे.

10 लाख रुपये खर्चून महिनाभर ही लोकोपयोगी मोहीम राबविली जाणार आहे.

यापूर्वी मा आ शिरिषदादा चौधरी यांनी स्वतः चे निवासस्थान इंदुमाई कोविड रुग्णासाठी देण्याचे जाहीर केले आहे. नंदुरबार येथे थ्री स्टार हॉटेल वर्ग केले आहे, मोठ्या प्रमाणावर अन्न दान केले आहे.

जनते साठी शक्य ते सर्व करणाऱ्या शिरिषदादा चौधरी व डॉ रवींद्र बापू चौधरी यांच्या या लक्षणीय कामाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button