Amalner

हरविला मोबाईल आणि अवघ्या सहा दिवसांत तपास लावत मोबाईल दिला परत…पोलिसांची उत्तम कामगिरी..!

हरविला मोबाईल आणि अवघ्या सहा दिवसांत तपास लावत मोबाईल दिला परत…पोलिसांची उत्तम कामगिरी..!

अमळनेर – नाश्ता करण्यासाठी गेलेल्या हातगाडीवर नाश्ता करत असताना नुकताच घेतलेला सुरजचा मोबाईल हरविला.पण सुरजला अमळनेर पोलीसांनी अवघ्या सहा तासात मोबाईलचा तपास लावून सुखद व आश्चर्यकारक धक्का दिला आहे. मेहनत व कष्टाने काम करून घेतलेला मोबाईल हरविला आणि सूरज हवालदिल झाला. सुरज शंकरलाल बठेजा हा महाविद्यालयीन युवक दि.१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरात रस्त्यालगत असलेल्या हातगाडीवर नाश्ता करण्यासाठी गेला असता त्या दरम्यान त्याचा मोबाईल हरवला असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सदर तरूण महाविद्यालयात शिकत असून ऑनलाईन क्लाससाठी आवश्यक असलेला मोबाईल त्याने एका कापड दुकानात नोकरी करून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी घेतलेला मोबाईल हरवल्याने निराश झालेल्या सूरज ने पोलीसात धाव घेतली.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. भरत श्रीराम ईशी यांनी तातडीने मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अवघ्या सहा तासात मोबाईलचा तपास लागला. मोबाईल मिळाल्याची माहिती मिळाल्या नंतर सुरजला खुपच आनंद झाला आहे.व त्याने पोलीसांचे मानले आभार मानले आहेत.

संबंधित लेख

Back to top button