Chandwad

भगवान बिरसा मुंडा जयंती / जनजातीय गौरव दिवस उत्साहात साजरा

भगवान बिरसा मुंडा जयंती / जनजातीय गौरव दिवस उत्साहात साजरा

उदय वायकोळे चांदवड

जि.प. प्राथमिक केंद्र शाळा चांदवड येथे भगवान बिरसा मुंडा जयंती / जनजातीय गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री शिरसाट सरांनी अध्यक्षीय सुचना मांडली व अनुमोदन श्री संदीप महाले सर यांनी दिले. मा. श्री. अशोक काका व्यवहारे यांनी अध्यक्ष स्थान भुषविले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा तालुकाध्यक्ष श्री मनोज शिंदे व भाजपा आदिवासी सेल अध्यक्ष संजय पाडवी होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रम प्रास्तविक मुख्याध्यापक श्री संदिप महाले सरांनी केले. व संजय पाडवी व श्री शिरसाठ सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे विषयी चरित्रात्मक माहिती देत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात मा. अशोक काका व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री चव्हाण सर यांनी केले. व आभार श्री सोनवणे सर यांनी मानले.
यावेळी मुकेश आहेर , विशाल ललवाणी , अंकुर कासलीवाल , प्रा उदय वायकोळे , सरपंच कैलास गुंजाळ , रूपेश पवार , विकी गवळी , किशोर क्षत्रिय , देवा पाटील , पत्रकार नितीन फंगाळ,महेश खंदारे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button