sawada

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाची कार्य प्रणाली अनूकरणिय! आमदार शिरीष चौधरी : प्राथमिक विद्या मंदीरात आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाची कार्य प्रणाली अनूकरणिय! आमदार शिरीष चौधरी : प्राथमिक विद्या मंदीरात आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

सावदा युसुफ शाह

येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाची शिक्षण प्रणाली अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार आमदार शिरीष चौधरी यांनी काढले. सावदा संचलित प्राथमिक विद्या मंदीर या शाळेत शैक्षणिक वर्ष 2019/20 साठी 5 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. यावल रावेर मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.श्री.शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या शुभ हस्ते फैजपूर रोड वरील ममता राणे नर्सरी येथे संपन्न झाला.समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थाध्यक्ष दिनानाथ देशमुख हे होते.
संस्थेने ज्ञानाची ज्योत कायम तेवत राहावी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका उषा तायडे मँडम,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक रविंद्र दगडू वारके,तसेच पदवीधर शिक्षक गणेश सुकदेव सापकर यांना चांदीचे पदक,सन्मानपत्र,शाल-श्रीफळ,गुलाबपुष्प देवून, त्यांच्या कार्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले .
आपल्या भाषणात मा.आमदार यांनी शिक्षण संस्था शिक्षकांचा गुणगौरव करण्यामागील कारण विशद करतांना, सर्वशिक्षक ज्ञानदानाचे काम करतच असतात व त्यातील काही विशेष शिक्षक इतरांना प्रेरणा मिळावी असे कार्य करीत असतात, त्यांच्या या कार्याची संस्था दखल घेवून त्यांना सन्मानित करीत असते.ही लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाची ही कार्यप्रणाली अनुकरणीय आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
सदर प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी शाळेची महती व शिस्त विषयी माहिती विषद केली. तसेच गटशिक्षणाधिकारी शैलेश दखने यांनी मनोगत व्यक्त करतांना वयाच्या 15 व्या वर्षी भारतीय वंशाच्या मुलीने कोरोना सारख्या दुर्धर आजारावर संशोधन करुन, आपला देश,आई,वडिल व शिक्षक यांची मान उंचावली असे मनोगत व्यक्त केले.
पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका उषा तायडे मँडम यांनी शिक्षकांचा चार अवस्था सांगून संस्थेने दिलेली कौतुकाची थाप व त्यातून कार्याला मिळणारी प्रेरणा व्यक्त केली.शाळेची माजी विद्यार्थिनी कु.साक्षी सापकर हिने शिक्षक हा बागेतील माळी असून, त्याने लावलेले विद्यार्थी रुपी असलेल्या लहान रोपट्याचे अनमोल मार्गदर्शनाने कसे सक्षम वटवृक्षात रुपांतर करतात व जीवनातील प्रत्येक परिस्थितीसाठी त्याला कसे तयार केले जाते याद्वारे शिक्षकांची महती वर्णन केले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावदा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता पंकज येवले,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,माजी नगराध्यक्ष राजेशभाऊ वानखेडे,गटशिक्षणाधिकारी शैलेश दखने,विस्तार अधिकारी एच.एम.तडवी,संस्थेचे सर्व संस्था चालक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर समारंभात प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर राणे यांनी केले. सुत्रसंचालन कल्पेश शिवदे सर यांनी तर आभार सुलोचना लोखंडे मँडम यांनी मानले.कार्यक्रमाला संगीताची साद सतपंथ कला केंद्र फैजपुर चे विद्यार्थी नारायण सरोदे,पुमंग किरंगे,गितेश सापकर यांनी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कार्यक्रम पार पाडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button