Washim

वाशीम मधील नागरिकाचा स्तुत्य उपक्रम, श्रमदानातून उभारलं ‘ लॉक डाउन गार्डन ‘

वाशीम मधील नागरिकाचा स्तुत्य उपक्रम, श्रमदानातून उभारलं ‘ लॉक डाउन गार्डन

वाशिम : 2020 या वर्षामध्ये भारतात कोरोना विषाणू दाखल झाला आणि सगळ्याची धाकधूक वाढली. मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. अनेकांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून घरात कोंडून रहाव लागलं. मात्र शासनाने या काळात काही वेळासाठी शिथिलता दिली होती. याच वेळेचा सदुपयोग करत वाशीमच्या ड्रिमलॅन्ड सिटीच्या नागरिकांनी स्त्युत्य उपक्रम राबविला. नागरिकांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमामुळे त्यांचं सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे.

वाशीमच्या ड्रीमलेन्ड सिटीमध्ये 1600 स्क्वेअर फुट जागेवर येथील रहवासी नारिकांनी लॉकडाऊन गार्डन उभारलं आहे.

या गार्डनच्या नावातच सर्वकाही आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या फावल्या वेळात ड्रिमलॅन्ड सिटीच्या नागरिकांनी हा अनोखा उपक्रम राबवला. परंतु, सर्व नागरिकांनी हे गार्डन उभारताना शासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन केलं. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं अनेक निर्बंध लावण्यात आले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन सतत प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत होतं. पण घरात कोंडून तरी किती राहणार, त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळात सर्व नियमांचं पालन करत ड्रिमलॅन्ड सिटीच्या नागरिकांनी सोसायटीच्या आवारात असलेल्या जागेवर बाग उभारली. नागरिकांनी श्रमदान केलंचं पण त्याचसोबत नागरिकांनी आर्थिक मदतीचाही हात पुढे केला. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात मोठं लॉकडाऊन गार्डन उभं करणं सहज शक्य झालं.

कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सर्वचजण घरांमध्ये कोंडले गेलो. लहान मुलांसाठी हा काळ तर अत्यंत वाईट होता. शाळा बंद झाल्या, तर घराबाहेर पडणं, बागडणंही बंद झालं. मात्र कॉलनीतील नागरिकांनी केलेल्या सकारात्मक विचारामुळे बच्चे कंपनीला खेळण्यासाठी हक्काचं गार्डन उभारलं गेलं.

लॉकडाऊनच्या फावल्या वेळात काही महाभागांनी रस्त्यावर फिरणं पसंद केलं मात्र त्याचा परिणाम म्हणून पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. तर काहींच घरातून काम सुरु होतं. अनेकांनी नियम मोडले. मात्र वाशीमच्या ड्रिमलॅन्ड सिटीने दाखवलेला एकोपा आणि सकारात्मकता पुढच्या काही काळात सकारात्मक उर्जा देणारी आहे.

Leave a Reply

Back to top button