Amalner

चौबारी येथून पशुधन चोरीला..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

चौबारी येथून पशुधन चोरीला..!मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील खळ्यातून पशुधन चोरीला गेल्याची घटना दि. २८ रोजी रात्री घडली आहे.
फिर्यादी संजय नामदेव माळी (रा. चौबारी) यांच्या फिर्यादीनुसार पाडसे शिवारातील त्यांच्या खळ्यात बांधलेले ३० हजार किमतीचे दोन बैल, ३ हजार किमतीचा एक गोऱ्हा, इतरांच्या २३ हजार किमतीच्या तीन गाई व एक वासरू असे एकूण ५६ हजार रुपये किमतीचे पशुधन दि. २८ सप्टेंबर रात्री ११ ते दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. त्यावरून मारवड पोलिसात भादवि कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सपोनि जयेश खलाणे व पो. उ. नि. वैभव पेठकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पो.ना. सचिन निकम हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button