Solapur

कोविड-१९ च्या काळात आॅनलाईन -आॅफलाईन शिक्षण काळाची गरज – डॉ. इरफान इनामदार अधिव्याख्याता डायट यांचे प्रतिपादन केंद्र अरण च्या शिक्षण परिषदेत गायकवाड वाडी शाळेचे लाईव्ह सादरीकरण

कोविड-१९ च्या काळात आॅनलाईन -आॅफलाईन शिक्षण काळाची गरज – डॉ. इरफान इनामदार अधिव्याख्याता डायट यांचे प्रतिपादन
केंद्र अरण च्या शिक्षण परिषदेत गायकवाड वाडी शाळेचे लाईव्ह सादरीकरण

सोलापूर: दिनांक २७/०८/२०२१ रोजी अरण केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाईन गुगल मीट अॅपद्वारे संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा, आॅनलाईन -आॅफलाईन शिक्षण, कोविड -१९ जनजागृती घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करुन या उपक्रमांतर्गत केंद्रातील सर्व शाळा उत्कृष्ट काम करीत असल्याचे प्रतिपादन करून सुरुवात केली. माढा बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री बंडू शिंदे यांनी प्रशासन विषयक कामांवर मार्गदर्शन केले. यामध्ये माझी शाळा – सुंदर शाळा उपक्रम ,मुख्याध्यापक पदोन्नती, स्वाध्याय उपक्रम इत्यादी विषयी माहिती सांगण्यात आली. तद्नंतर ज्ञानप्रकाश फाउंडेशन पुणे चे समन्वयक श्री संभाजी रोडे यांनी स्वाध्याय उपक्रम, एन.ए .एस.चाचण्या, मनरेगा अंतर्गत कामे, शाळा विकास आराखडा, शाळा व्यवस्थापन समिती विषय या विषयांवर मार्गदर्शन केले. राऊतवस्ती शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री विकास शेळके यांनी इयत्ता तिसरी एन.ए.एस .चाचण्या, अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती या घटकांवर भाषा व परिसर अभ्यास या विषयांचे सादरीकरण केले. तसेच हनुमान वाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक कापसे यांनी इयत्ता तिसरी एन. ए. एस. चाचण्या इयत्ता तिसरी गणित विषयावर मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेमध्ये अरण केंद्रातील स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत श्री संतोष शिरसागर यांनी चोपडे वस्ती शाळेचे सादरीकरण केले तसेच गायकवाड शाळेचे उपक्रमशील शिक्षक अभिजीत चवरे यांनी ऑनलाइन लाईव्ह माध्यमातून स्वच्छ शाळा सुंदर शाळा याचे सादरीकरण केले. शिक्षण परिषदेमध्ये डायट सोलापूरचे अधिव्याख्याता डॉ. इरफान इनामदार यांनी एन. ए.एस.चाचण्या ,ऑनलाईन/ ऑफलाइन शिक्षण काळाची गरज त्यातील विविध उपक्रम, विविध पोर्टल, शगुन पोर्टल ,जीवन शिक्षण उपक्रम ,ऑडिओ -व्हिडिओ निर्मिती, लेख निर्मिती इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले .
तसेच डॉ. विलास काळे यांची सोलापूर जिल्हा जीवनकौशल्य विषयक मुल्यांकन साधनसंच विकसन समिती ( LSV) या जिल्हा स्तरावरील समिती वर केंद्र प्रमुख प्रतिनिधी म्हणून निवड झाले बद्दल विशेष अभिनंदन केले.
कोरोना विषयक जनजागृती, त्रिसूत्रीचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण परिषदेचे आभार प्रदर्शन ठेंगल वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी ढेंबरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button