Chimur

जिवघेण्या नाल्यावरुन अधिका-यांची टोलवाटोलवी—-::: कवडू लोहकरे व शेतकऱ्यांचा आंदोलनाचा ईशारा

जिवघेण्या नाल्यावरुन अधिका-यांची टोलवाटोलवी—-::: कवडू लोहकरे व शेतकऱ्यांचा आंदोलनाचा ईशारा

अनेक शेतकरी नाल्यात पडल्याच्या घटना घडल्या.

ज्ञानेश्वर जुमनाके

चिमुर—:::चिमुर नगरपरिषद अंतर्गत उमा नदीवर वाटर प्यूरीफ़ायर प्लँट जवळ कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे.ह्याच बंधा-याला लागुन जीवघेणा पाणी वाहनारा नाला आहे. सतत वाहणाऱ्या नाल्ल्यामुळे २० ते ३० शेतक-यांना जिव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागतो. याच नाल्यात ५ शेतकरी नाल्यात पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने जिवीत हाणी झाली नाही.

जिवघेण्या नाल्यावरुन अधिका-यांची टोलवाटोलवी----::: कवडू लोहकरे व शेतकऱ्यांचा आंदोलनाचा ईशारा

नगरपरिषद चे मुख्याधिकारी व जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी यांच्यासोबत कवडू लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बैठक घेतली परंतु दोन्ही अधिका-यांनी एकमेकाकडे बोट दाखविले. सतत दोन वर्षांपासुन शेतकरी शासकिय कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहे. पन त्याचा काहीच फायदा झाला नाही.ये-जा करण्यासाठी पुल असने गरजेचे आहे. नगरपरिषद चिमुर व जिल्हा परिषद जलसंधारण विभागाने त्वरीत तोडगा काढून नाल्यावर पुल बांधण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कवडू लोहकरे यांनी दिला.

कवडू लोहकरे यांचे मत

“”” जीवघेण्या नाल्यावरुन जातांना शेतकरी पडल्यास व मृत्यु झाल्यास सबंधित प्रशासन जबाबदार राहणार या विषयावर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याशी चर्चा करनार”””

कवडू लोहकरे
अध्यक्ष पर्यावरण संवर्धन समीती चिमुर

****

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button