उस्मानाबाद

साहित्य समाजभानातुन निर्माण होते—तनुजा ढेरे

साहित्य समाजभानातुन निर्माण होते—तनुजा ढेरे

राहुल खरात
उस्मानाबाद (प्रतिनिधी)दि.२८
दैनंदिन जीवन जगत आसतांना समाजात वावरतांना अनेक भले —बुरे अनुभव येत आसतात.कांही अनुभव स्मरणातुन जातच नाहित.जगणे आणि साहित्य याचा घनिष्ठ संबंध असल्याणेच आलेल्या समाजभानातून साहित्य निर्माण होते.या अनुभवातुनच मी कथा,कविता,कादंबरी,लेख हे साहित्याचे प्रकार हाताळले आहेत असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात आज दि.२८रोजी, मराठी वांड् मय मंडळाचे उदघाटन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे, येथील कवयिञी सौ.तनुजा ढेरे यांनी केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.यावेळी प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रा.डाॅ.देविदास इंगळे,प्रा.राजा जगताप उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी डाॅ.बापूजी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन केले.पुढे बोलतांना तनुजा ढेरे म्हणाल्या की,आपण शिक्षण घेत आसतांना चांगली पुस्तके वाचा त्यावर चिंतन करा मनन करा व योग्य शब्द वापरून कविता,लेख लिहायला सुरवात करा मी अनुभवातुनच लिहित गेले मी उस्मानाबाद येथील असुन पोहणेर हे माझे आजोळ असून येथील अनुभव मी कवितेत व कादंबरीत मांडले आहेत आपणही भविष्यात लेखक व्हावे असे त्यांनी आवाहन केले.यावेळि तनुजा ढेरे यांनी त्यांनी लिहिलेली चार पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट दिली.अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,मराठी,हिंदी,इंग्रजी या भाषेंचे मिळून मराठी वांड् मय मंडळ आहे या मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी व त्यांच्यातील कवी,लेखक जन्माला यावा यासाठी हे मंडळ प्रयत्न करत असते व “विवेकानंद” अंकातुन लिहिणारे अनेकजन पुढे लेखक म्हणून उदयाला आले आहेत तनुजा ढेरे या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून त्यांनी कवयिञी म्हणून नाव मिळवले आहे त्यांचे साहित्य आपण वाचावे.प्रास्ताविक डाॅ.ए.बी.इंदलकर यांनी केले पाहुण्यांची ओळख प्रा.डाॅ.देविदास इंगळे यांनी करून दिली.सूञसंचालन प्रा.शिवाजी गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले यावेळी प्रा.माधव उगीले,प्रा.श्रीराम नागरगोजे,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.आतुल देशमुख उपस्थित होते.यावेळी विद्यार्थी—विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button