Faijpur

इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीनिमित्त दि३०ऑक्टोबर रोजी मद्यविक्री, देशी दारु व बिअर बार बंद ठेवण्यात यावी

इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीनिमित्त दि३०ऑक्टोबर रोजी मद्यविक्री, देशी दारु व बिअर बार बंद ठेवण्यात यावी

फैजपूर– इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीनिमित्त दि३०ऑक्टोबर रोजी मद्यविक्री, देशी दारु व बिअर बार बंद ठेवण्यात यावी या मागणीसाठी फैजपूर मुस्लिम बांधवांतर्फे फैजपूर प्रांताधिकारी यांना आज सोमवारी निवेदन देण्यात आले

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी

या निवेदनात म्हटले आहे की,देशातील व जगातील थोर पुरुषांच्या जयंती निमित्त केंद्र व राज्य शासनांच्या राजपत्रात संपुर्ण देशात सूटी धोषीत
केलेली आहे.व त्या दिवशी देशातील सर्व कार्यालय बंद असतात तसेच शासकीय नियमानुसार मधविक्री, देशी दारु तसेच बिअर बार सुध्दा बंद असतात.म्हणून
केंद्र व राज्य शासनाचे राज्यपत्रानुसार शासकीय सुटीच्या दिवशी येत्या दि.३०ऑक्टोबर रोजी इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंतीच्या दिवशी मद्य विक्री,देशी दारु व बिअर बार बंद ठेवणेचे आदेश देण्यात यावे या मागणीचे निवेदन फैजपूर मुस्लिम बांधवांतर्फे प्रांताधिकारी कैलास कडलक यांना देण्यात आले निवेदन देतांना काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान,नगरसेवक रशीद तडवी,सैय्यद कौसर अलि,सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान शेख इकबाल, शाकिरखान , आसिफ मॅकेनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button