Pandharpur

लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने पंढरपूर बसस्थानकावर निराश्रित नागरिकांना उबदार वस्त्रांचे वाटप :- नगरसेवक विवेक परदेशी

लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने पंढरपूर बसस्थानकावर निराश्रित नागरिकांना उबदार वस्त्रांचे वाटप :- नगरसेवक विवेक परदेशी

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर बस स्थानकावर अनेक निराश्रित लोक रात्रीच्या वेळी आसऱ्यास असतात. लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने पंढरपूर बस स्थानकावरील निराश्रित लोकांना स्वेटर, शाली,कानटोप्या व मफलर यांचे वाटप केले. सर्व लोकांना त्याचा खूप आनंद झाला व त्यांनी तो व्यक्त पण केला.थंडी चा प्रतिबंध करणारी साधने असतानाही कितीतरी लोक न्यूमोनिया सारख्या रोगास बळी पडत आहेत मग ज्यांना कसलाच निवारा नाही,अंगावरचे कपडे सुद्धा पुरेसे नाहीत अशा अवस्थेत त्यातल्या त्यात वृद्धांची, लहान बालकांची काय अवस्था होत असेल? याचा विचार करून लायन्स क्लब पंढरपूरने क्लब सदस्य व नागरिकांना वापरात नसलेले स्वेटर्स व थंडीरोधक वस्त्रांची मागणी केली होती. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. पंढरपूर बसस्थानक, दत्त घाट, स्मशानभूमी जवळील पत्राशेड अशा ठिकाणी सदर उबदार वस्त्राचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी लायन्स क्लब च्या वतीने पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात आले की थंडी वाढत असल्याने गरिब व निराश्रित लोकांना उबदार कपडे देउन मदत करावी.
सदर प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री विवेक परदेशी, सचिवा ललिता कोळवले, ज्येष्ठ सदस्य श्री राजीव कटेकर, श्री ओंकार बसवंती , सौ आरती बसवंती व रॉबिन हूड आर्मीचे सदस्य श्री दिपक सगर, श्री शुभम माने, श्री विनायक लोखंडे आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button