Bhusawal

भुसावळ कला विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्त्वविकास कार्यक्रम संपन्न..

भुसावळ कला विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्त्वविकास कार्यक्रम संपन्न..

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

कला विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मानव्यविद्याशा अंतर्गत कार्यक्रम सप्ताहात मराठी विभाग आयोजित भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमास धारीवाल महाविद्यालय, जामनेर येथील प्रा. डॉ. अक्षय घोरपडे यांनी ‘भाषिक कौशल्य व व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सदर व्याख्यानात त्यांनी श्रवण, भाषण, वाचन, लेखन या चार कौशल्यावर भर दिला. यामधून मानवाचा विकास होत असतो असे मत मांडले. व्यक्तीने गुणग्राहक असावे असेही ते म्हणाले, या बरोबरच माणसाने नैतिकता आणि मानवता या मूल्यांचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे मॅडम यांनी अध्यक्षीय मनोगतात चारही भाषिक कौशल्या विषयी माहिती दिली व माणसाने माणुसकी सोडू नये हे मत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के.के. अहिरे यांनी केले. वक्त्यांचा परिचय डॉ. स्वाती महाजन यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. वंदना महाजन यांनी केले. आभार प्रा. भारती सोनवणे यांनी मानले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.ए.डी. गोस्वामी,उपप्राचार्य डॉ. एन.ई. भंगाळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी एच बऱ्हाटे राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजेंद्र नाडेकर, डॉ. डी.एम. टेकाडे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.एच. इंगोले,डॉ. दीपक शिरसाठ, इंग्रजी विभागातील डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डी. एन .पाटील, शिक्षणशास्त्र विभागातील प्रा. डॉ.पी.ए. अहिरे , हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोज पाटील, डॉ. राजेंद्र तायडे मानव्य विद्याशाखेतील प्राध्यापक बहुसंख्येने हजर होते.मराठी विभागातील प्राध्यापक डॉ.जे.एफ. पाटील, प्रा. पुरुषोत्तम महाजन. डॉ. दीनानाथ पाठक, प्रा. गौतम भालेराव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button