Champa

लायन्स क्लब स्मार्ट सिटी नागपूर तर्फे चांपा गावाला नऊ कचरापेटी व दोन कचरा वाहक धक्कल गाडीची भेट

लायन्स क्लब स्मार्ट सिटी नागपूर तर्फे चांपा गावाला नऊ कचरापेटी व दोन कचरा वाहक धक्कल गाडीची भेट

अनिल पवार

चांपा ता,लायन्स क्लब स्मार्टसिटी नागपूर तर्फे चांपा गावाला नऊ कचरापेटी व दोन कचरा वाहक धक्कल गाडीची भेट देण्यात आली चांपा गावात कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक निर्मूलन ,आदी स्वछता संदर्भात अनेक उपक्रमांतर्गत सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावात प्लस्टिकमूक्त अभियान, नाली साफसफाई, गाव स्वछता अभियान असे गाव स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबवल्यानंतर सुद्धा गावात कचरा व्यवस्थापन करीता कचरा गोळा करण्यास व सार्वजनिक जागेवर कचरा पेटी नसल्यामुळे गावात जागोजागी कचरा पसरलेला दिसत होता.

गावात सरपंच अतिश पवार यांनी कचरा व्यवस्थापन करावे म्हणून ठरवले.कचरा व्यवस्थापन करण्यासाठी गावात कचरा पेटी आवश्यक होत्या ग्रामपंचायतला निधी अभावी सरपंचांनी लॉयन्स क्लब स्मार्ट सिटी नागपूर च्या अध्यक्षा यांच्याशी संपर्क सपंर्क साधला व गावात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा पेटीची मागणी केली.असता अखेर सरपंच अतिश पवार यांच्या मागणीला यश आले ,लॉयन्स क्लबच्या अध्यक्षा मा.सौ संगीता साबळे यांनी चांपा ग्रामपंचायतला नऊ कचरापेट्या व दोन कचरा वाहक धक्कल गाडी गावाला भेट दिली. यावेळी उपस्थितीत लॉयन क्लब स्मार्ट सिटीच्या अध्यक्ष सौ संगीता साबळे , झोन चयरमेन श्री वासू ठाकरेसर ,सौ रेश्मा इटकेलवर सचिव, सौ स्वाती जैस्वाल कोषाअध्यक्ष ,परियोजना डायरेक्ट डॉ रोहितदादा माडेवार, ऍड मनोज साबळे, अश्रफ अली सर आदी लॉयन्स क्लबचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सरपंच अतिश पवार यांना भेट देण्यात आल्या.

गावात घनकचरा व्यवस्थापनकरिता निधीची आवश्यकता नसून लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. गावात वॉर्डनिहाय जाऊन लोकांना वर्गीकरण कसं करावं याची शिकवण देणार.

ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा यासाठी वेगवेगळे डबे केवळ उपलब्ध करून देणार नाही तर ते कसे वापरावे याची माहिती हि नागरिकांना देणार असल्याचे सरपंच अतिश पवार यांनी सांगितले आहे. तसेच नियम मोडण्याऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

गावातील घनकचऱ्याची व्यवस्थितपणे हाताळणी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी तीन तत्त्वं पाळली पाहिजेत.

उघड्यावर (सार्वजनिक ठिकाणी) कचरा टाकणार नाही, इतरांना टाकू देणार नाही.
ग्रामपंचायतीनं ठरवून दिलेल्या पद्धतीनं कचऱ्याचं वर्गीकरण करणार.
प्लास्टिकचा वापर टाळणार.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button