Pandharpur

दिवाळीच्या सणात गरिबांच्या घरी प्रकाश टाका रेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल, चण्याची, तुळीची डाळ व केरोसीन उपलब्ध करा मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्याकडे मागणी

दिवाळीच्या सणात गरिबांच्या घरी प्रकाश टाका रेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल, चण्याची, तुळीची डाळ व केरोसीन उपलब्ध करा मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी
रफीक आत्तार

पंढरपूर मागील अनेक महिन्यापासून कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल होत असून बाजारपेठा व व्यापाऱ्यांचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. काही दिवसावरच दिवाळी सारखा सण असल्यामुळे मजूर वर्ग व सामान्य कुटुंबातील गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. त्यांची दिवाळी अंधारात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यांचा घरात प्रकाश टाकण्याकरिता रेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल,तुरीची , चण्याची डाळ व केरोसीन उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी
मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्याकडे मागणी करणार आहे ग्रामीण भागात लोडशेडिंग व विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित झाला तर केरोसीन तेलाचा दिवा लावण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरु आहे. ग्रामीण भागात विद्युत खंडित झाल्यावर तीन ते चार किंवा त्यापेक्षा अधिक तास विद्युत पुरवठा करण्यास वेळ लागतो. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात त्यामुळे अंधारात दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे त्यांना हा वेगळा धोका आहे. मा. उच्च न्यायालयाचा व शासनाचा निर्णया प्रमाणे शिधापत्रिका धारकांकडे गॅस जोडणी नाही. त्यांना केरोसीन मिळणे बंधनकारक आहे. परंतु विना गॅसधारक शिधापत्रिका धारकांना केरोसीन मिळणे बंद झाले आहे. गॅस धारकांना त्यांचे गॅस सिलेंडर संपल्यावर शहरी भागात कमीत कमी २ दिवसानंतर व ग्रामीण भागात कमीत कमी आठ दिवस व अतिदुर्गम भागात १६ दिवसानंतर सिलेंडर मिळते. या दरम्यान त्या गॅस धारकांनी स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो.
आपल्या भागामध्ये मजूर व सामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. मागील अनेक महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापूढे पडला आहे. सामान्य कुटुंबातील गृहिणीचे दैनंदिन व दिवाळीचे नियोजन चुकले आहे. दिवाळीच्या सन काही दिवसावर असताना आता त्यांचा घरात प्रकाश टाकण्यासाठी अल्प दरात खाद्य तेल, तुरीची, चण्याची डाळ, व केरोसीन उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्याकडे मागणी करणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button