Nashik

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करणार : कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत सभापती आमदार दिलीपराव बनकर यांची घोषणा .

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करणार : कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत सभापती आमदार दिलीपराव बनकर यांची घोषणा .

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या लूटमारीच्या तक्रारीनंतर आज सभापती आमदार दिलीपराव बनकर यांनी उपसभापती दीपक बोरस्ते यांच्यासह शेतकरी-व्यापारी समन्वय यांची बैठक घेतली. तसेच टोमॅटो खरेदी किंमतीत शेतकऱ्यांना चोवीस तासांच्या आत पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांची लूटमार सुरूच ठेवल्यास संबंधित आडतदार व व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करू, असे आश्वासन आमदार दिलीपराव बनकर यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. ओझरचे आशिष शिंदे या टोमॅटो उत्पादक युवा शेतकऱ्याने काल फेसबुक लाईव्ह तक्रार केली होती.
गोदाकाठच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत यापुढे शेतकऱ्यांची लूटमार सुरूच राहिल्यास शिवसेना स्टाईलने व्यापाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा यावेळी दिला. पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, युवासेनेचे आशिष शिंदे, देवेंद्र काजळे, प्रकाश वाटपाडे, योगेश कुयटे, प्रवीण जगताप, भाऊ घुमरे यांनीही शेतकऱ्यांच्या तीव्र भावना यावेळी मांडत कारवाईची मागणी केली. व्यापाऱ्यांच्या वतीने सोहनलाल भंडारी यांनी भूमिका मांडली. आडत प्रतिनिधी सुभाषनाना होळकर, सुरेश खोडे, सोमनाथ निमसे, नंदू गांगुर्डे, अरुण चव्हानके यांनीही चर्चेत भाग घेतला. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button