Pune

जिद्द व चिकाटीने शिकले, सर्व आव्हाने स्वीकारून प्रयत्नपूर्वक कार्य केल्यास यश मिळेल- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

जिद्द व चिकाटीने शिकले, सर्व आव्हाने स्वीकारून प्रयत्नपूर्वक कार्य केल्यास यश मिळेल- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते निमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, कला महाविद्यालय भिगवण, श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत निमगाव ता. इंदापूर येथे आयोजित केले असून शिबिराच्या उदघाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना स्वयंसेवकांनी या शिबिर कालावधीमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा व उपक्रमशीलतेच्या जोरावर जिद्द व चिकाटीने शिकल्यास, प्राप्त परिस्थितीत सर्व आव्हाने स्वीकारल्यास प्रयत्नपूर्वक कार्य केल्यास यश संपादन करता येईल असे मत व्यक्त केले.
या शिबिरामध्ये तीन महाविद्यालयातील 250 स्वयंसेवक सहभागी होणार असून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, वृक्षलागवड, आर्थिक सर्वेक्षण, इतिहासलेखन, जैवविविधता, जीआयएस मॅपिंग, पर्यावरण जाणीव जागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ उत्तम व जबाबदार नागरिक घडवण्यासाठी, चांगली पिढी घडवण्यासाठी ही शिबिरे उपयोगी असून या शिबिराचा अनुभव इतरांना शेअर केल्यास विधायक क्रांती घडेल. शिक्षण ही एक शक्ती आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. इंदापूर तालुका शिक्षणाच्या बाबतीत मोठी वाटचाल करीत आहे.
कुलगुरू नितीन करमळकर म्हणाले की,’ आत्मनिर्भर भारतासाठी नवीन शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल केले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी, आपल्या जीवनातील पायाभरणीसाठी ही शिबिरे विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरतील. नाविन्यपूर्ण शिक्षण तसेच ज्या क्षेत्राची आपल्याला आवड व अभिरुची आहे त्यामध्ये आपण करिअर करावे. समाजातील अनेक गोष्टीचे निरीक्षण करून आपण घडलो पाहिजे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी शिबिरात होणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामकरण संदर्भात राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे योगदान तसेच सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्यासंदर्भात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या योगदाना विषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मराठी विभाग प्रमुख डॉ.राजाराम गावडे यांनी लिहिलेले प्रबोधनमहर्षी संत गाडगेबाबा पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माझ्या हिरकणीची वाट या ग्रंथासाठी भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांना गौरविले असून त्यांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख सुरेश गोसावी, संस्थेचे संचालक विलास वाघमोडे,मनोहर चौधरी, गणपत भोंग, पराग जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश जाधव, कर्मयोगी कारखान्याचे संचालक राहुल जाधव, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष अतुल मिसाळ, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका विस्तारक राजकुमार जठार, सावता परिषदेचे प्रदेश संघटक संतोष राजगुरू, ग्रामविकास अधिकारी अमोल मिसाळ, माजी उपसरपंच अशोक मिसाळ, श्री. गणेश पतसंस्थेचे चेअरमन किशोर पवार, कचरवाडीचे माजी सरपंच धनाजी कचरे, ग्रामपंचायत सदस्य दादाराम शेंडे, केतकेश्वर पतसंस्थेचे गोरख आदलिंग यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय मोरे यांनी केले. आभार बावडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे यांनी मानले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ. गजानन कदम, प्राध्यापिका मनीषा गायकवाड, डॉ. अनिल बनसोडे, डॉ.प्रकाश पांढरमिसे, प्रा. भारत शेंडे तसेच सहकारी प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button