Amalner

अमळनेर येथे ” नेतुत्व विकास कार्यशाळा ” महिलांमध्ये नेतुत्व विकसित करण्यासाठी, आत्मविश्वासाची गरज – श्रीकांत झांबरे …..

अमळनेर येथे ” नेतुत्व विकास कार्यशाळा ” महिलांमध्ये नेतुत्व विकसित करण्यासाठी, आत्मविश्वासाची गरज – श्रीकांत झांबरे ………….

अमळनेर : आत्मविश्वास बाजारात विकत मिळणारी गोस्ट नाही ,त्या साठी तुम्हाला सकारात्मक विचार आणि सकस आहार करण्याची गरज आहे .
या साठी चांगल्या विचारांचे व्यक्तीं सोबत सम्पर्क असावा लागतो . बॅंकेत स्वतः चे बचत खाते उघडा , त्यात दर आठवडा ,दर महा बचत करत रहा , बचतीचे पैसे व्यवहारात आणा .आपल्या परिसरात चालेल असा , आपल्याला जमेल असा, शेती पूरक व सेवा व्यवसाय निवडा. बचतगटांच्या माध्य मातून भांडवल उभेकरून व्यवसायाला सुरुवात करावी . शेतीसंदर्भातील असे बरेच व्यवसाय आहेत त्याचा शोधघ्या . यामूळे नेतुत्व सोबतच आर्थिक विकास देखिल साध्य होईल . असे प्रतिपादन अमळनेर येथील मंगळ ग्रह देव सभागृहात, राजमाता जिजाऊ महिला मंडळ अमळनेर आणि राष्ट्रीय कृषि व ग्रामिण विकास बॅंक ( नाबार्ड ) जळगांव यांनी आयोजित केलेल्या ,
“नेतुत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमात ” श्रीकांत . के . झांबरे असिस्टंट जनरल मॅनेजर नाबार्ड हे म्हणाले . कृषि सखी कल्पना मिस्त्री यांनी शेंद्रिय शेती साठी लागणारे , दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिके करून दाखवले ., जळगांव येथिल झाशीच्या राणी महिला बचतगटांच्या अद्यक्षा रुद्राणी देवरे यांनी महिला चे आरोग्य आणि सॅनिटरी पॅड या विषयावर माहिती दिली. उपस्थित महिलांना नाबार्ड कडून मोफत सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाचे उदघाटक श्रीकांत झांबरे AGM नाबार्ड , कार्यक्रम अध्यक्ष – सौ . पूनम भटू पाटील मा . उपसभापती पंचायतसमिती अमळनेर तर प्रमुख पाहुणे सौ . माधुरी प्रमोद पाटील उपाध्यक्षा – खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर ह्या होत्या .
. भटू पाटील मास्टर ट्रेनर NRLM यशदा पुणे , सौ . नूतन पाटील प्रशिक्षक MSRLM महाराष्ट्र , शालिग्राम पाटील सेवानिवृत्त लेखापाल , हरीचंद्र कढरे निवृत्त केंद्र प्रमुख जिप .जळगांव
यांनी प्रशिक्षण दिले . तालुक्यातून १५ गटातील ४५ महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button