Pandharpur

पुढारी अन कारखानदार पत्रकारांना कामा पुरते वापरतात.. जे्ष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

पुढारी अन कारखानदार पत्रकारांना कामा पुरते वापरतात.. जे्ष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर पत्रकारांनी आपली लेखणीतून ज्याप्रमाणे समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा तसेच समाजामधील भ्रष्टाचार, लाचलुचपत शासकीय घोटाळे तसेच अन्य कित्येक ज्वलंत प्रश्नांची मांडणी आपल्या लेखणीतून करून समाजजागृती तसेच प्रबोधन आणि भ्रष्टाचारावर अंकुश बसवण्याचे काम पत्रकारांनी आपल्या लेखणी मधून केलेले आहे. पत्रकार हा आर्थिक दृष्ट्या अतिशय दुर्बल असल्यामुळे त्याला आपल्या पत्रकारितेतून आपले व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह नीट करता येऊ शकत नाही परंतु पत्रकारितेचा वसा घेतलेले असल्यामुळे हा पत्रकार अन्याय-अत्याचार ,भ्रष्टाचार, लाचलुचपत आदी विषयावर तो आपले परखड विचार मांडत असतो. आपल्या लेखणीच्या माध्यमातून भ्रष्ट राजकारण्यांना ताळ्यावर आणण्याचे काम हा पत्रकार आपल्या पत्रकारितेतून करीत असतो.आज कालची पुढारी नेतेमंडळी तसेच कारखानदारी चेअरमनपद अध्यक्ष पद भूषविणारे काही पुढारी मंडळी हे पत्रकारांच्या लेखणीचा वापर फक्त स्वार्थासाठी आणि कामापुरताच करतात हेच सर्वत्र दिसून येत आहे. अशा पुढाऱ्यांचे ज्याप्रमाणे हा पत्रकार कौतुक करतो स्तुती करतो त्याच प्रमाणे त्याने अवगुन देखील समाजासमोर आणावेत. तरच हे राजकारणी पुढारी लोक ताळ्यावर येतील . असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार दैनिक पंढरी संचार चे संस्थापक संपादक बाळासाहेब बडवे यांनी अरिहंत इंग्लिश स्कूल येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी पुढे बोलत असताना ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी अरिहंत इंग्लिश स्कूल च्या प्रगतीचे कौतुक करून तसेच या अरिहंत इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून अरिहंत बुलेटीन न्यूज चॅनल चे उद्घाटन केले. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून देखील भारतीय संस्कृतीची जपणूक केलेली आहे. भारतीय संस्कृतीचा विसर पडला नाही. अरिहंत इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून अरिहंत बुलेटीन न्युज हे सुरू करण्यात आले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना पंढरपुरातील पत्रकार मंडळी सर्व प्रकारचे सहकार्य करतील. असे आश्वासन याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी दिले.
या कार्यक्रमास अरिहंत इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर शितल शहा तसेच उज्वल दोशी मुख्याध्यापिका बहिरट मॅडम तसेच पंढरपूर शहरातील विविध पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button