Ausa

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांचे कडून लक्ष्मण कांबळे याना कोविड योद्धा म्हणून सन्मानित

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांचे कडून लक्ष्मण कांबळे याना कोविड योद्धा म्हणून सन्मानित

औसा : औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भिम आर्मीचे जिल्हा महासचिव व सत्य पोलीस टाईम्स न्युज चे उपसंपादक व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कोष्याध्यक्ष श्री लक्ष्मण कांबळे यांना २०२१ साठी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कडून कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
सध्या जग कोरोना व्हायरस ला लढा देण्यासाठी शर्तीचा प्रयत्न करत आहे. याला तोंड देण्यासाठी लॉक डाऊन सारखी परस्थिती निर्माण करावी लागली, आशा कालावधीत डॉक्टर , नर्स पोलीस पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते हे आपल्या जीवावर उद्धार होऊन,समाजाची सेवा करत आहेत ,म्हणून औसा तालुक्यातील तपसे चिंचोली चे सामाजिक कार्यकर्ते तथा सत्य पोलीस टाईम्सच्या च्या माध्यमातून जण सामान्यांना न्याय मिळवून कांबळे यांनी दिले यांनी कोरोना काळात निस्वार्थी पणे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची पावती म्हणून सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष भाऊ मरगळे व संस्थापक तथा राज्य सरचिटणीस मा बाबासाहेब पावसे पाटील यांनी लक्ष्मण कांबळे यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले आहे, सन्मान पत्र मिळाले बद्दल याचे अनेक मान्यवरांनी लक्ष्मण कांबळे यांचे अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button