kalamb

कळंब उस्मानाबाद जि.म.स.बँक अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियानास सुरवात

कळंब उस्मानाबाद जि.म.स.बँक अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियानास सुरवात

सलमान मुल्ला कळंब

कळंब : केंद्रशासन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याद्वारे दि.७ जुलै रोजी आर्थिक साक्षरता अभियान या मोहिमेस सुरवात करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत कळंब मुख्य शाखेत नाबार्ड उस्मानाबाद जिल्हा डीडीएम चैतन्य गोखले,बँकेचे उपसरव्यवस्थापक नाईकवाडी, मास्टर ट्रेनर बी.एस.गरड, कळंब शाखेचे शाखाधिकारी आर.बी.काळे, एल.एन.लोमटे यांनी केंद्रशासनाकडुन शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना,पीक कर्ज त्वरीत परत फेड फायदे तसेच ऑनलाईन फसवणुकीबाबत गोखले यांनी मार्गदर्शन केले.

आर्थिक साक्षरता अभियान पुर्ण जिल्ह्यामध्ये दि. 01-07-2021 ते दि.10-07-2021 पर्यंत जिल्ह्यात अभियान चालु आहे. या कार्यक्रमास कळंब मुख्य शाखेमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बंधु उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button