Motha Waghoda

मोठे वाघोदा बस स्टँड परिसरात गतिरोधक बसवावे बसस्टँण्ड परीसरात खचलेल्या साईट पट्या ही भरण्यात याव्यात

मोठे वाघोदा बस स्टँड परिसरात गतिरोधक बसवावे बसस्टँण्ड परीसरात खचलेल्या साईट पट्या ही भरण्यात याव्यात

माणुसकी समुहासह कमलाकर माळी सरपंच मुबारक ( राजू ) तडवी यांची मागणी.

मोठा वाघोदा प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे बस स्टँड परिसरात महामार्ग क्र 6 वरील बुरहाणपुर अंकलेश्वर महामार्गावर गतिरोधक बसविण्यासह साईड पट्माटया भरण्याची मागणी माणुसकी समुहातर्फे कमलाकर माळी यांनी केली आहे.बुरहानपुर अंकलेश्वर हा महामार्ग खुप रहदारी चा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाव परिसर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची तसेच वाहनांची नेहमी वर्दळ असते.या महामार्गावर दिवसेंदिवस किरकोळ मोठमोठे जीवघेणी अपघात होत असतात.या महामार्गावर गतिरोधक नसल्याने या हायवेवर वाहने सुसाट धावताना दिसतात. दैनंदीन या रस्त्यावर किरकोळ अपघात होताना दिसत आहे त्यामुळे गाव सुरू झाल्यापासून ते गाव संपेपर्यंत तीन ते चार गतिरोधक बसवावे.तसेच बसस्टँण्ड परीसरात रस्त्यावरील साईट पट्ट्या ही खचल्या आहे. त्यामुळे दुर्घटना घडतच आहेत आणि कधीकाळी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी सार्यावजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांच्या मागणी ची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी माणुसकी समुहातर्फे कमलाकर माळी यांनी सामाजिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे.तसेच कमलाकर माळी यांनी या विषयी सामाजिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आय बी शेख यांच्याशी यासंबंधी कमलाकर माळी यांनी फोन वर माहिती घेतली असता.हा महामार्ग नँशनल असल्याने याचा सर्व कारभार जळगाव विभागाकडे आहे.आम्ही पण काही विषय याकडे कळविल्या आहेत तरी आपण पुढे यांच्याशी यासंदर्भात संपर्क करु किंवा तुम्ही संबंधित विभागाकडे भेट देऊन काम करुन घेऊ शकता असे सांगितले.तसेच या खचलेल्या पट्याविषयी सरपंच मुबारक तडवी यांनी अधिकार्यांना वेळोवेळी याकडे लक्ष द्यावे असे सांगुनही याकडे सा.बा विभागाचे दुर्लक्ष होत आहे .तरी लवकरच ग्रामस्थांतर्फे जळगाव येथे सा.बां.विभाग यांच्या कडे या गतिरोधक बसविण्याची मागणी.तसेच या साईट पट्याविषयी निवेदन करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button