MaharashtraNashik

भूमी अभिलेख विभाग नकोरे बाबा दिंडोरीत सामन्याची परवड दोन्ही वजना विना कागद हलत नाही अशी वेळ

भूमी अभिलेख विभाग नकोरे बाबा दिंडोरीत सामन्याची परवड दोन्ही वजना विना कागद हलत नाही अशी वेळ

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वर्गाकडन मनमानी पद्धतीने कामकाज केले जात असून सामान्य नागरिकांना वेठीस धरून किरकोळ कामासाठी हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांशी यासंदर्भात वारंवार चर्चा करून देखील कामकाजात सुधारणा होत नसल्यामुळे यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात येणार असुन या कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास तालुका भूमी अभिलेख कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व बोपेगाव चे सरपंच वसंतराव कावळे यांनी दिला आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी तालुका भूमी अभिलेख कार्यालयात ग्रामीण भागातील नागरिक आपल्या मिळकतीचे सिटी सर्व्हे उतारे,सात बारा गट स्किम उत्तारे एकत्रीकरण तसेच शासकीय मोजणी यासंदर्भातील दस्तऐवज मिळण्यासाठी येतात तेव्हा त्यांनी केलेल्या अर्जाची पोहच दिली जात नाही कार्यालयात असलेल्या एका कागदी खोक्यात अर्ज टाकण्यास सांगितले जाते त्यानंतर अर्जाची चौकशी करण्यास गेलेल्या नागरिकांना अर्ज कधी केला होता, त्याची तारीख सांगा, अर्ज कोणाकडे दिला होता असे अनेक तथ्यहीन प्रश्न विचारून त्रस्त केले जाते. मोजण्या कागदोपत्री पुनर्मोजणी अशाप्रकारे परस्पर अर्ज सादर केली जातात मात्र मोजण्याचे पैसे भरून वाया जातात परंतु मोजण्या होत नाही कोणत्याही प्रकारे या ठिकाणी शासकीय कार्यालयात अपेक्षित असलेल्या पद्धतीने काम केले जात नाही अशा प्रकारे नागरिकांना वेठीस धरून अवास्तव पैशांची मागणी केली जाते ती पूर्ण झाल्यास दस्तऐवज शोधण्याचे काम सुरू असून मिळाल्यास आपल्याला उपलब्ध करून देऊ अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून नागरिकांना किरकोळ कामांसाठी वारंवार हेलपाटे मारायला भाग पाडले जाते या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीला तालुक्यातील जनता वैतागली असल्याचा आरोप कावळे यांनी केला असून ,कामकाजात सुधारणा न झाल्यास कार्यालयास टाळे लावण्याचा ईशारा दिंडोरी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे

चौकट- कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना होणारा मनःस्ताप सहनशिलतेच्या पलीकडे गेला असून नागरिकांना आपल्या मिळकतीच्या संदर्भात या कार्यालयाकडे उपलब्ध असलेली माहिती दिली जात नाही परिणामी शेकडो मिळकतीना गेली कित्येक वर्षांपासून वारसनोंदी होऊ शकलेल्या नाहीत यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांचेकडे तक्रार करण्यात आली असून सुधारणा न झाल्यास कार्यालयास कुलूप लावले जाईल.

वसंतराव कावळे

तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस दिंडोरी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button