Ahamdanagar

त्रिपुरासुराच्या वधाप्रित्यर्थ घोटनच्या मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात लक्षद्वीप दिव्यांची दिपांजली ?

त्रिपुरासुराच्या वधाप्रित्यर्थ घोटनच्या मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात लक्षद्वीप दिव्यांची दिपांजली ?

लक्षदिपहे उजळले राउळी,दारी शोभली सडा रांगोळी, घोटनच्या मंदिरात, सायंकाळी, आली त्रिपुरारी, आली त्रिपुरारी…

अहमदनगर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र घोटन येथील मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात त्रिपुरासुराच्या वधाप्रित्यर्थ पाचहजार दिव्यांची दिपांजली अर्पण करण्यात आली. याबाबत पौराणिक कथा अशी आहे की त्रिपुरासुर नावाच्या राक्षसांनी प्रुथ्वी, आकाश,पाताळ या तिन्ही ताळात देव,दानव,मानव, यांचा छळ करून हाहाःकार मातला होता. मग देवांनी मदतीसाठी भगवान शंकराचा धावा केला.मग प्रसन्न होउन भगवान शंकरांनी देव,दानव,मानव यांना छळनाऱ्या त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध या पौर्णिमेच्या दिवशीच केला होता आणि सर्वांना या राक्षसाच्या जाचातून मुक्त केले होते म्हणून कार्तिक पौर्णिमेला विजयोत्सव साजरा करण्यासाठी शिवमंदिरात लक्षदिप लावण्याची प्रथा सुरु झालेली आहे.याच पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. घोटन येथील मल्लिकार्जुनेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर असून महाभारतातील अर्जुनाने या ठिकाणी गायांचा सांभाळ करण्यासाठी गोठे बांधले होते म्हणून या गावाला घोटन हे नाव पडले आहे. त्रिपुरासुराच्या वधाप्रित्यर्थ या पांडवकालीन शिव मंदिरावर गावातील शिवभक्तांनी पाचहजार दिवे लाउन त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली.दिलिप शिंदे,रवींद्र शिंदे,गणेश निकम,एकनाथ मिसाळ, विठ्ठल थोरवे,भारत टाकळकर, महादेव मोटकर,पप्पू मोटकर,शिवाजी टाकळकर,सुरेश म्हस्के, रणजित घुगे,अमोल दिवेकर, भगवान घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button