Pune

करेवाडीत ३२ एकराच्या आसपास ऊस जळाला ; लाखोंचे नुकसान

करेवाडीत ३२ एकराच्या आसपास ऊस जळाला ; लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि करेवाडी गावाच्या शिवेवर आज दुपारी दिड च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तब्बल ३२ एकर पेक्षा अधिक ऊस जळून खाक झाला.आगीचे लोट मोठे असल्याने ही आग नियंत्रणात आणने कठीण जात होते मात्र त्यातून ही प्रयत्न करुन आठ ते दहा एकर ऊस वाचवण्यात यश आल्याचे करेवाडीचे पोलिस पाटील विजयकुमार शामराव करे यांनी सांगितले आहे.ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे कारण अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी इंदापूर पोलिस दाखल झाले आहेत.

आप्पा धोंडिबा करे यांच्या गट नं.७२ मधील ऊसाच्या शेतात ऊस तोड चालू होती. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास ऊस तोड मजुरांना जवळच आग लागल्याचे दिसले. त्यानंतर आग लागली असल्याचा गोंधळ झाला. स्थानिक नागरिक व आसपासचे शेतकरी तात्काळ ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी धावले.दरम्यान वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने आग अधिकचं भडकली गेली.त्यामुळे तिला नियंत्रित करणे सहज शक्य झाले नाही. आग विझवण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेची मदत घेण्याचा प्रयत्न केला.करेवाडी ग्राम सुरक्षा यंत्रणेला या संदर्भात भ्रमणध्वनी केला मात्र यंत्रणा कार्यान्वित नसल्याने ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून मदत मिळू शकली नाही असं देखील पोलिस पाटील करे यांनी म्हटले आहे.

या आगीत आप्पा धोंडिबा करे ६ एकर, गोरख रंगनाथ करे ३ एकर, भारत रंगनाथ करे ३ एकर , अलका मच्छिंद्र करे ३ एकर, माणिक पांडुरंग करे अडीच एकर,मोहन महादेव करे ४ एकर , छाया आप्पा करे ४ एकर,गणपत साधू करे आणि चंद्रकांत गणपत करे ४ एकर,बापू शेंडगे ४ एकर असा जवळपास ३२ एकर पेक्षा अधिक ऊस जळाला आहे.या आगीमुळे वरील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button