प्रा जयश्री साळुंकेसंपादकीय

आखाडा विधानसभेचा महाराष्ट्रातील बदलते/ढासळते राजकारण… युवा पिढी आणि झोपलेला मतदार…सरडा कमी रंग बदलतो इतका राजकारणी पक्ष बदलतो

आखाडा विधानसभेचा
महाराष्ट्रातील बदलते/ढासळते राजकारण… युवा पिढी आणि झोपलेला मतदार…सरडा कमी रंग बदलतो इतका राजकारणी पक्ष बदलतो

आखाडा विधानसभेचा महाराष्ट्रातील बदलते/ढासळते राजकारण... युवा पिढी आणि झोपलेला मतदार...सरडा कमी रंग बदलतो इतका राजकारणी पक्ष बदलतो

आखाडा विधानसभेचा महाराष्ट्रातील बदलते/ढासळते राजकारण... युवा पिढी आणि झोपलेला मतदार...सरडा कमी रंग बदलतो इतका राजकारणी पक्ष बदलतो


प्रा जयश्री साळुंके
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे तुफानासारखे जोरदार वाहत आहेत.भारताच्या  इतिहासात
महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्वतंत्र अध्याय आहे.स्वातंत्र्य आंदोलनात आणि त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकीय ध्येय,धोरणे, कार्य यांनी भारताच्या राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे.उदा.महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, जॉर्ज फर्नांडीस, कॉंम्रेड डांगे, बाळासाहेब ठाकरे,कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे,इ.
अत्यन्त विश्वासू,जनतेशी प्रामाणिक, कार्यकुशल,राजनैतिक जाणीव असलेले,दिग्जज राजनीतीज्ञ महाराष्ट्राच्या मातीने पाहिले आहेत,अनुभवले आहेत.जनता डोळे झाकून राजकीय पक्ष आणि नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने मतदानाचा हक्क बजावून आपले प्रश्न समस्या मांडण्यासाठी पाठवत होती.विरोधी पक्ष आणि पक्षनेते यांनीही अत्यन्त स्पष्टपणे आपली कर्तव्य पार पाडली. उदा. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींच्या बळावर विरोधी पक्षाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.
एकनिष्ठता,खंबीरपणा, अभ्यास, जनतेच्या समस्यांची जाणीव,त्याग,समर्पण इ.च्या जोरावर अनेक चांगली कामे महाराष्ट्रा च्या मातीत लोकप्रतिनिधींनी केली आहेत.चळवळी तुन राजकारण असा प्रवास महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांचा पहावयास मिळतो.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे दलित चळवळ,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून बाळासाहेब ठाकरे,शेतकरी चळवळीतून  शरद जोशी,कम्युनिस्ट चळवळीतून श्रीपाद डांगे,यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले शरद पवार इ नेते संघर्षातून घडले.म्हणून जनतेशी प्रामाणिक राहिले.
आजकाल चळवळीचा आणि राजकारण याचा संबंध राहिला नाही. उठसुठ कोणीही पैश्यांच्या आणि घराणे शाहीच्या जोरावर राजकारणात यायचं आणि जनतेला मूर्ख कसं बनवायचं,काळा पैसा पांढरा कसा करता येईल, घराणे शाही कशी टिकविता येईल एव्हढच लक्ष्य लोक प्रतिनिधींच आहे.
सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता तरुण पिढी आणि मतदार यांना चुकीच्या दिशेने लोक प्रतिनिधी घेऊन जाताना दिसत आहेत.
रात्री तुन पक्ष बदलणे,स्वार्था साठी निवडणूक लढविणे, पैश्यांच्या जोरावर निवडणूक जिंकणे,विकास कामे न करता जनतेची दिशाभूल करणे इ मुळे जनता मूर्ख बनत चालली आहे. आणि लोकप्रतिनिधी जनतेला मूर्ख बनविण्यात यशस्वी होत आहेत.विशेषतः तरुणाई निवडणूक, मतदान,लोकशाही,हक्क याविषयांकडे गांभीर्याने पाहत नाही.निव्वळ खाणे,पिणे,मौज मजा,बॅनर बाजी या दृष्टीने तरुणाई राजकारणाकडे पाहत आहे किंवा आकृष्ट होत आहे.
सामान्य जनता,शेतकरी,आदिवासी, दलित,महिला,इतर वंचित घटक यांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे.
हे संकेत आणि परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासासाठी घातक आहे. याचे अनेक दूरगामी परिणाम महाराष्ट्राची जनता,अर्थकारण,समाजकारण, धार्मिकता,सांस्कृतिकता,
चळवळी इ वर होणार आहेत.याचा विचार मतदारांनी अत्यन्त सुक्ष्म पणे करून आपल्याला हुकूमशाही, घराणेशाही हवी आहे की खरी निस्वार्थ लोकशाही हे पाहूनच मतदान करून महाराष्ट्राची शान टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Back to top button