Ahamdanagar

डिग्रस येथे बिरोबा महाराज यात्रा महोत्सवात कोयबा देवस्थान प्राणप्रतिष्ठा आणि ग्रंथ पारायण सोहळा संपन्न

डिग्रस येथे बिरोबा महाराज यात्रा महोत्सवात कोयबा देवस्थान प्राणप्रतिष्ठा आणि ग्रंथ पारायण सोहळा संपन्न

सुनिल नजन अहमदनगर

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे बिरोबा महाराज यात्रा महोत्सवात कोयबा देवस्थान प्राणप्रतिष्ठा आणि लोकदेवता विठ्ठल बिरुदेव म्हाळोबा याग्रंथाचा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.काकड आरती, प्रवचन,भजन,किर्तन, हरिपाठ, वाणवह्या, महाजलाभिषेक, सवाद्य मिरवणूक,ह.भ.प. एकनाथ खाटेकर यांच्या वाणीतून होईक, आणि हर्षद पारधे ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात ज्ञानेश्वर महाराज उकांडे,अक्षय महाराज काकडे अमोल महाराज पिसे यांची किर्तने झाली.या कार्यक्रमासाठी दत्तात्रय महानोर, सुरेश बेल्हेकर, डी.जे.महानोर, विलास मोहिते, नानासाहेब बेल्हेकर, सत्यवान खाटेकर, बाबासाहेब महानोर,अप्पासाहेब ढोकणे,तुकाराम भुसारी, नवनाथ बर्डे, नितीन पवार, योगेश पवार, बाळासाहेब मंडलिक यांनी विषेश परिश्रम घेतले.संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मीरी येथील बीरोबा भक्त सिताराम भगत, आबासाहेब वीर,सोलाट वायरमन यांनी वहीगायन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button