Kolhapur

कोल्हापूर खगोलप्रेमीनी केले पिंक सुपरमून चे निरीक्षण

कोल्हापूर खगोलप्रेमीनी केले पिंक सुपरमून चे निरीक्षण

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर दि, 27 रोजी चैत्र पौर्णिमेला 2021 सालातील पहिला विलोभनीय पिंक सुपरमून कोल्हापुरातील खगोलप्रेमींना ढगांच्या गर्दीत अत्यंत थोड्या काळासाठी पाहता आला, चंद्र सायंकाळी सात वाजून 15 मिनिटांनी पूर्व क्षितिजावर उगवला , नेहमीच्या पौर्णिमे पेक्षा आजचा चंद्र आकाराने 10 टक्के जादा व 30 टक्के जास्त तेजस्वी दिसत होता, पृथ्वी व चंद्र या मधील आजचे अंतर 3 लाख 57 हजार किलोमीटर होते, ज्यांनी दि, 26, 27 एप्रिल रोजी चंद्र पाहिला नाही, त्यांनी दिनांक 28 रोजी सायंकाळी पाहायला हरकत नाही, तरीही शक्य न झाल्यास मे महिन्यातील दिनांक 25, 26 व 27 रोजी ढगांची परिस्थिती पाहून रात्रभरात कोणत्याही वेळी उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करावे, दुर्बिणी ची गरज नाही, कोरोना चे सर्व नियम पाळून चंबुखडी परिसरात किरण गवळी, खगोल अभ्यासक, कोल्हापूर यांचे सोबत डॉ, राजेंद्र भस्मे, वैभव राऊत, यश आंबोळे, अभिषेक मिठारी इत्यादींनी निरीक्षणे केली,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button