Amalner

उपमुख्याधिकाऱ्यांवर चाकूहल्ला;दोघांना 7 वर्षांचा कारावास

उपमुख्याधिकाऱ्यांवर चाकूहल्ला;दोघांना 7 वर्षांचा कारावास

अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करून 5 हजार रु हिसकावून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.कुणाल,आकाश व राजेश हे तीन आरोपी हया प्रकरणात होते यातील राजेश हा अल्पवयीन असल्याने त्याचा खटला बाल न्यायालयात पाठविण्यात आला आहे.तर उर्वरित दोघांना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी गायकवाड हे २ नोव्हेंबर २०१९ ला रात्री दहा ते अकराच्या दरम्यान नाशिक जाण्यासाठी धुळे रस्त्यावर साई प्रसाद हॉटेलसमोर बसले असताना धुळ्याकडून दुचाकीवर (एमएच १९,७५०३) आकाश शंकर शिंदे (रा. गलवाडे रोड) कुणाल विजय शिंपी (रा. शिवशक्ती चौकराजेश एकनाथ निकुंभ (रा. सुभाष चौक) हे तिघे आले व त्यांनी गायकवाड यांच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गायकवाड यांनी मोबाईल घट्ट धरून ठेवला. पुन्हा काही वेळानंतर तिघांनी परत येऊन त्यांनी गायकवाड यांच्या वरच्या खिशातून पाच हजार काढून घेतले आणि डाव्या बरगडीवर व दोन ठिकाणी मांडीवर चाकूने हल्ला करून पळून गेले होते.सरकारी वकील ॲड. किशोर बागूल यांनी यात ११ साक्षीदार तपासले. त्यात तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक जी. बी. सूर्यवंशी, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. नीलेश गोराणे, डॉ. निर्मल चौधरी, आरिफ खान, नायब तहसीलदार कमलाकर जोशी यांची साक्ष आणि गायकवाड यांनी आरोपींना जिल्हा कारागृहात व न्यायालयात ओळखल्याने जिल्हा सत्र न्या. व्ही. आर. जोशी यांनी कुणाल शिंपी व आकाश शिंदे यांना सात वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली तर राजेश याचा खटला बाल न्यायालयात प्रलंबित आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची निघाली होती. त्याबाबत फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जबरी चोरी करून जीवे मारण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button