Amalner

Amalner: “होय मी सावरकर”..अमळनेरात भाजपातर्फे निघाली सावरकर गौरव यात्रा

Amalner: “होय मी सावरकर”..अमळनेरात भाजपातर्फे निघाली सावरकर गौरव यात्रा

अमळनेर – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावरकरांच्या सन्मानार्थ सावरकर गौरव यात्रा काढून “होय मी सावरकर”असा संदेश देण्यात आला.
सदर यात्रेदरम्यान सावरकरांच्या कार्याची आणि राष्ट्रभक्तीची माहिती असलेली ध्वनिफीत यावेळी जनतेला ऐकविण्यात आली.भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी आमदार स्मिताताई वाघ आणि माजी आ.डॉ.बी एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दुचाकीवर विराजमान झाले होते.महाराणा प्रताप चौकातून यात्रेस सुरुवात होऊन मंगलमूर्ती चौक, स्टेशन रोड, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा ,तिरंगा चौक ,बस स्टॅन्ड मार्गे पुन्हा ही यात्रा महाराणा प्रताप चौकात येऊन याठिकाणी समारोप करण्यात आला. तसेच तालुक्यातील मंगरूळ, टाकरखेडा,पातोंडा या ग्रामीण भागात देखील यात्रा रथ नेण्यात आला. या गौरव यात्रेत सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उस्फुर्तपणे सहभागी झाले होते,या यात्रेने शहराचे लक्ष वेधले होते.

नेहरूंना मानणाऱ्या लोकांना सावरकर कळणार नाहीत

यात्रेच्या समारोप प्रसंगी माजी आमदार स्मिता वाघ पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे मोठे नाव. ते भारतीय इतिहासातील महत्वाचे व्यक्तीमत्व ठरलेत,त्यांनी आपले जीवन भारतासाठी समर्पित केले,,1857 च्या बंडाला पहिले स्वातंत्र्य युद्ध त्यांनी म्हटले होते,तुरुंगातील त्यांच्या कष्टप्रत जीवनाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत,भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना समान दर्जा देण्याची मागणी त्यांनीच केली होती,अश्या महान व्यक्तिमत्वास राजकीय स्वार्थीसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधीनी बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला हे अत्यंत दुर्देवी आहे,ज्या नेहरुंमुळे भारताचे तीन तुकडे झाले त्यांना मानणाऱ्यांना सावरकर कळणार नाही,अन्नत्याग करून त्यांनी जीवन त्याग केला असे थोर सावरकर कालही आमच्या मनात जिवंत होते,आजही आहेत,उद्याही राहतील आणि सदैव जिवंत असतील असे त्यांनी सांगितले.
सदर गौरव यात्रेत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button