Bollywood

किंग खानचा मुलगा आर्यन NCB च्या ताब्यात..!बॉलिवूड चा कर्दनकाळ समीर वानखेडेची कार्यवाही..!

किंग खानचा मुलगा आर्यन NCB च्या ताब्यात..!बॉलिवूड चा कर्दनकाळ समीर वानखेडेची कार्यवाही..!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान हा अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) ने टाकलेल्या छाप्यात सापडला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. आर्यन हा लोकप्रिय स्टार किड आहे. त्याचे अजून बॉलीवूडमध्ये पदार्पण झालेले नाही. तरी ही तो प्रचंड लोकप्रिय आहे. तो सतत चर्चेत असतो सोशल मीडियावर सक्रिय असतो.

सध्या आर्यन खान एका मोठया प्रकरणात चर्चेत आहे .आणि अडचणीतही सापडला आहे. NCB च्या टीमने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजावर छापा टाकला ज्यात ड्रग्ज पार्टी सुरू होती. या पार्टीत बॉलिवूड, फॅशन आणि बिझनेस इंडस्ट्रीमधून अनेक सिलेब्रिटी सहभागी होते.याच पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील सहभागी होता.

बॉलिवूड चे कर्दनकाळ मराठमोळे मावळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. समीर वानखेडे यांनी जेंव्हा पासून म्हणजेच सुशांत सिंग राजपूत प्रकारणापासून सूत्रे हाती घेतली आहेत.तेंव्हा पासून कार्यवाही धडाका लावला आहे. बॉलिवूड मधील ड्रग्ज शी संबंधित असलेले सर्वच त्यांच्या निशाण्यावर आहेत.

आता जहाज प्रकरणात एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.यात आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा इ चा समावेश आहे.
NCB ने मिळालेल्या गुप्त माहितीच्या नुसार कारवाई केली व यातही बॉलिवूड लिंक समोर आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button