Amalner

? कोरोनासारखा राजकीय श्रेयवाद पुन्हा उफाळला…

? कोरोनासारखा राजकीय श्रेयवाद पुन्हा उफाळला…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर

सध्या अमळनेर शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील जन जीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दिड महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. या अत्यन्त गंभीर परिस्थिती तही शहरातील राजकीय श्रेयवादाचा कोरोना उफाळून आला आहे. पांझरा नदीला आलेल्या पाण्यामुळे हा राजकीय श्रेयाचा पूर आला आहे.अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात आले आहे. आता ह्या मागे श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले असून आजी माजी आमदारांमध्ये राजकीय कोरोना उसळला आहे.

अमळनेर तालुक्याची स्थिती अत्यंत वाईट असून कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सामान्य जनतेला दोन वेळच्या उदरनिर्वाहाची भ्रांत आहे.मजूर,कामगार,शेतकरी इ ठप्प झाले आहेत. व्यापार,उद्योग,आर्थिक उलाढाल संपूर्ण तालुक्यात ठप्प झाला आहे. जन सामान्यांचे जन जीवन विस्कळीत झाले आहे. आणि आजी माजी आमदारांना पाण्याचे आवर्तन कोणी सोडले याची पडली आहे. दोन्ही कडील समर्थक आप आपल्या पद्धतीने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमळनेर तालुक्यातील हा श्रेयवादाचा खेळ फार जुना आहे.दोन्हीब0 आजी आमदार केलेल्या कामांच्या श्रेयवादाच्या लढाईत खूपच मग्न राहिले.यात पाडळसरे धरणाचा मुख्य विषय आणि काम बाजूला पडले ते पडलेच..भेटी घेणे,फोटो काढणे,बातम्या लावणे,श्रेय लाटणे यातच पाच वर्षे केंव्हा संपली हे लोकप्रतिनिधी आणि जनतेलाही समजले नाही.जनता गाफील राहिली आणि कौवा कब खेत चुन गया पताही नहीं चला…

आता पुन्हा अत्यन्त बिकट परिस्थितीत श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.जनता सावधान..श्रेयवादाच्या लढाईत पुन्हा 5 वर्ष निघून जातील आणि हातात काहीच लागणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button