Bollywood

किंग खानच्या मुलीचे  लवकरच बॉलिवूड मध्ये प्रदार्पण..!ह्या सिनेमाद्वारे येईल प्रेक्षकांसमोर…!

किंग खानच्या मुलीचे लवकरच बॉलिवूड मध्ये प्रदार्पण..!ह्या सिनेमाद्वारे येईल प्रेक्षकांसमोर…!

मुंबई बॉलिवूड मधीलन अभिनेत्यांची मुले चित्रपटसृष्टीत पदार्पण वेगाने प्रवेश करत आहेत. इशान खट्टर, जान्हवी कपूर, सारा अली खान यांनी बॉलीवुडमध्ये एन्ट्री केलीच आहे. किंग खान अर्थात शाहरुख खानची कन्या सुहाना खानही बॉलीवुडमध्ये पदार्पण करत असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असा अंदाज आहे. ‘आर्ची’ या अमेरिकन कॉमिक पात्रावर चित्रपट बनवण्याचा विचार झोया अख्तर करत असून यात सुहाना दिसणार आहे. सध्या चित्रपटातील कलाकार अजून ठरलेले नाहीत.पण एक महत्त्वाची भूमिका सुहाना साकारणार आहे. इतर स्टारकिड्सप्रमाणे सुहानाचीसुद्धा बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, हे काही वर्षांपूर्वी शाहरुख खानने सांगितलं होतं.

तिने लंडनमध्ये ‘रोमिओ अँड जुलिएट’ या नाटकात काम केलं होतं. तेव्हा तिचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. नंतर ती ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ नावाच्या लघुपटामध्ये चमकली होती आणि तिच्या कामाचं कौतुक देखील झालं होतं. सुहानाची दमदार कामगिरी आणि संवादफेकपाहून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार असल्याचे संकेत मिळाले होते.

संबंधित लेख

Back to top button