Bollywood

“या” कारणास्तव किंग खान शाहरुख आणि सिंघम अजय देवगण ने कधीच केले नाही एकत्र काम…!

“या” कारणास्तव किंग खान शाहरुख आणि सिंघम अजय देवगण ने कधीच केले नाही एकत्र काम…!

मुंबई बॉलिवूड मधील सर्वात जास्त लोकप्रिय दोन कलाकार शाहरुख आणि अजय देवगण हे कधीच एकत्र काम करताना दिसले नाहीत. वास्तविक बॉलिवूड मधील सर्वात हिट जोडी शाहरुख आणि काजोल यांची होती.हि जोडी जेव्हापण पडद्यावर येते तेव्हा धमाल मस्ती आणि एक वेगळाच माहोल असतो. ह्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी चांगली आहे तितकीच घट्ट मैत्री त्यांची खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे.
असे असूनही शाहरुख आणि अजय देवगण म्हणजे काजोल चा पती यांनी दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही.शाहरुख आणि काजोल एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि हि मैत्री गेल्या २५ वर्षांपासून कायम आहे. परंतु चकित करण्यासारखी गोष्ट म्हणजे शाहरुख खान आणि काजोलचा पती अजय देवगण ह्या दोघांमध्ये तशी खास काही मैत्री नाही.

शाहरुख खान आणि अजय देवगण यांची आधीपासून मैत्री नव्हती असे नाही तर नंतर असे काही झाले कि दोघांची हि मैत्री तुटली. एक किस्सा असा घडला की दोघांची मैत्री तुटली.
१९९५ मध्ये राकेश रोशन हे करन अर्जुन चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्यांचा शोध घेत होते. करन अर्जुन चित्रपटासाठी राकेश रोशन ह्यांनी अगोदर सनी देओल आणि अजय देवगण ह्यांना साईन केले होते. परंतु काही कारणास्तव सनी देओलने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
त्यानंतर राकेश रोशन ह्यांनी शाहरुख खान आणि अजय देवगण ह्या दोघांना चित्रपटासाठी फायनल केले होते. परंतु चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर अजय देवगणला वाटले कि अश्या प्रकारच्या भूमिका त्याने इतर चित्रपटात केल्या आहेत.
त्यामुळे अजय देवगणने राकेश रोशन यांच्याकडे मागणी केली की दोघांच्या भूमिकेची अदलाबदल करावी. म्हणजेच चित्रपटात जी भूमिका शाहरुखला दिलेली होती ती अजयला हवी होती आणि अजयची भूमिका शाहरुखला द्यावी. परंतु दिग्दर्शक राकेश रोशन ह्या गोष्टीसाठी तयार नव्हते.
यानंतर शाहरुख खान आणि राकेश रोशन ह्यांच्यात सुद्धा थोडे वाद होऊ लागले. शेवटी शाहरुख आणि अजय देवगणने दोघांनी चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजय देवगणने त्यानंतर करन अर्जुन चित्रपट सोडला.
परंतु एक महिन्यानंतर अजय देवगणला समजले कि शाहरुखने वचन दिले होते कि तो सुद्धा हा चित्रपट सोडणार, पण त्याने हा चित्रपट सोडला नाही. तो अजूनही या चित्रपटात आहे. हे समजल्यावर अजयला शाहरुखचा चांगलाच राग आला.
ह्या कारणामुळे शाहरुख आणि अजय देवगण जवळजवळ ३० वर्ष बॉलिवूडमध्ये आहेत, परंतु तरीसुद्धा हे दोघे एकत्र कोणत्याच चित्रपटात दिसले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काजोल च्या मध्यस्ती मुळे देखील पुन्हा दोघे मित्र झाले नाही

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button