Nanded

भोकर तालुक्यातील खरीप पिके संततधार पावसाने आली धोक्यात: गेली ५ वर्षापासून शेतकरी संकटात

भोकर तालुक्यातील खरीप पिके संततधार पावसाने आली धोक्यात: गेली ५ वर्षापासून शेतकरी संकटात

गोविंद सुर्यवंशी नांदेड

नांदेड : भोकर तालुक्यातील निसर्गाच्या अवकृपेमुळे गेली ५ वर्षापासून शेतकरी संकटात सापडला असून भोकर तालुक्यात खरीप पिके हंगामात आली की पावसाने पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून चालू वर्षी देखील संततधार पाऊस चालू असल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.
खरीप हंगाम 2017 पासून शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या संकटाला सामोरे जावे लागत आहे कधी पाऊस वेळेवर झाला नाही म्हणून पिके वाया गेली तर कधी हंगामाच्या वेळी पाऊस झाल्याने तोंडावर आलेला घास निसर्गाने पळवून नेला. मागील वर्षी अतिवृष्टीने पाऊस झाल्याने मूग उडीद सोयाबीन ला मोड फुटले तर ज्वारी काळी पडली कापसाची बोंडे ही नासून गेली. 2019 व 2018 मध्ये सुद्धा पीक विम्याचा प्रश्न शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर अडचणीचा गेला.इतर तालुक्यात पिक विमा मिळाला मात्र भोकर तालुक्यात पीक विमा मिळाला नव्हता,शेतकऱ्यांना गेली पाच वर्षापासून सतत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे कसेबसे पीक घरात आले तर त्याला बाजारात भाव मिळत नाही व्यापार्‍यांकडून लूट केली जाते मालाला हमीभाव मिळत नाही. कवडीमोल भावाने मालाची विक्री करावी लागते.
चालूवर्षीचा खरीप हंगामगही वाया जाण्याची शक्यता: चारही मंडळात अतिवृष्टीने झाला पाऊस
***********************
चालू वर्षीच्या खरीप हंगामात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पेरण्या योग्यप्रकारे झाल्या उगवण चांगली झाली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली पुन्हा पाउस काही विश्रांतीनंतर झाला पिके योग्य प्रमाणात वाढली मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर संततधार सुरू केली 6 व 7 सप्टेंबर रोजी भोकर तालुक्यातील चारही मंडळात अतिवृष्टीने पाऊस झाला मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, या पिकांचे प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान झाले नद्या-नाल्यांना पूर आले शेतामध्ये पाणी साचून पिके नासून गेली. 4890 हेक्टर हून अधिक क्षेत्र बाधित झाले, सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शासनाच्या वतीने पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत मात्र त्यानंतर ही संततधार पाऊस सुरू असल्याने चालू वर्षीचा खरीप हंगाम देखील वाया जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी
*****************************
भोकर तालुक्यात चालू वर्षीच्या खरीप हंगामाचे अतिवृष्टीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हाता तोंडावर आलेले पीक मूग उडीद सोयाबीन हे पावसाने वाया गेले कापूस पिकावर ही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून उत्पादनात प्रचंड घट होणार आहे ज्वारीचे पीक सुद्धा वाया गेले आहे.शासनाने पिकाचे पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर विविध संघटना व पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पिक विमा कंपनी कडून सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण येत असून ऑनलाईन पिकांचे नुकसान झाल्याची माहिती भरत असताना मोठ्या अडचणी येत आहेत वेबसाईट बंदच राहत आहे ऑफलाईन अर्ज मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button