Amalner

? दंगल राजकारणाची..खान्देशात राष्ट्रवादी शिरजोर काँग्रेस कमजोर..

खान्देशात
राष्ट्रवादी शिरजोर काँग्रेस कमजोर..

अमळनेर

-भाजपचे बहुजन नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केला आणि राज्याचे राजकारण ढवळुन निघाले खडसेंच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस ला बळ मिळाले खान्देशात जळगाव धुळे नंदुरबार असे तीन जिल्हे येतात धुळे शहराचे माजी आमदार अनिल आण्णा गोटे अगोदरच राष्ट्रवादीत डेरे दाखल झाले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढली आहे सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच आमदार आहे यापूर्वी त्यांचे पाच सहा आमदार असायचे खानदेश पूर्वी कॉंग्रेस चा बालेकिल्ला होता त्याला शह देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले परंतु काळाच्या ओघात त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांची ताकत कमी केली त्यांनाच ताकत देण्याचे काम करावे लागणार आहे खडसे लेवा पाटील समाजाचे आहेत समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे हा समाज आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडला गेला आहे असे मानण्यात येते धुळे जिल्ह्यातील अनिल आण्णा गोटे यांच्या मूळे धुळे शहरातील त्यांना मानणाऱ्या लोक राष्ट्रवादी ला जोडला गेला आहे त्यामुळे राजवर्धन कदमबांडे यांच्या पक्ष सोडल्या मूळे झालेली हानी भरून निघाली आहे त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा जोरात आली असल्याचे दिसून येत आहे.

त्या मानाने काँग्रेस पक्ष कोणतीही हालचाल करताना व डॅमेज कॅट्रोल करताना दिसत नाही खान्देशात आजही काँग्रेस ला अनुकूल वातावरण आहे धुळे नंदुरबार जिल्हा काँग्रेस चा बालेकिल्ला आहे अमरीश भाई व चंद्रकांत रघुवंशी यांचे सारखे दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडल्यावर देखील नंदुरबार जिल्ह्यातून दोन धुळे व जळगाव जिल्ह्यातुन प्रत्येकी एक अशे चार आमदार निवडून आले आहेत काँग्रेसने जर खान्देशात लक्ष दिले व सोशल इंजिनिअरिंग केले तर पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते यासाठी त्यांनी पक्षापासून दुरावलेले पारंपरिक मतदार जोडला पाहिजे अमरीश भाई व चंद्रकांत रघुवंशी पक्षातून बाहेर पडल्यामुळे ओबीसी समाज पक्षापासून दुरावला गेला आहे त्यामुळे काँग्रेस ने खान्देशातील ओबीसी समाजासाठी काम करणारा एखादा कार्यकर्त्याला राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिली तर पक्षाच्या फायद्याचे राहील खान्देशातील वीस मतदार संघात व लोकसभेच्या चार मतदार संघात त्याचा फायदा होईल त्यामुळे काँग्रेस पक्षांसह आघाडी ला फायदा होईल परंतु काँग्रेसचे थंडा करके खाओ या काम करायचा पद्धतीमुळे त्यांचे नुकसान होते परंतु त्यांनी खान्देशात अश्याप्रकारे सोशल इंजिनियरिंग केले तर काँग्रेस फायद्यात राहू शकते.

एकनाथराव खडसेंच्या पक्षांतरामुळे पुन्हा एकदा खानदेश केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठया संख्येने आउट गोइंग झाले होते त्याचा फटका दोन्ही पक्षांना झाला आहे त्यामुळे ही हानी भरून काढण्यासाठी या दोन्ही पक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे सुदैवाने राज्यपाल नियुक्त आमदार करणे बाकी आहे त्याचा फायदा घेऊन खान्देशात काँग्रेसची ताकत वाढवणे गरजेचे आहे.

काँग्रेस कडे उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा नाहीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत छगन भुजबळ जितेंद्र आव्हाड हे पूर्वीपासून काम करीत आहेत त्यात अनिल आण्णा गोटे हे धनगर समाजाचे नेते जोडून घेतले आता खडसे साहेबांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे लेवासमाज जोडला जाइल त्यामुळे त्या पक्षाची ताकत निश्चितपणे वाढली आहे
काँग्रेसने ओबीसी शिक्षक नेते विलासराव पाटील यांना संधि द्यावी.
खान्देशात काँग्रेस पक्षाला एक ओबीसी चेहऱ्याची गरज आहे ती गरज विलासराव पाटील यांच्या रूपाने पुरी होऊ शकते ते एन एस यु आय या विध्यार्थी संघटनेचे काम करीत होते ओबीसी सेल चे काम केले आहे आणि आता काँग्रेस शिक्षक सेलचे नाशिक विभागाचे पदाधिकारी आहेत मुळात त्यांचा पिंड हा चळवळीचा आहे त्यामुळे सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात त्यांनी तीन वेळेस नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातुन ओबीसी शिक्षक संघटनेतर्फे निवडणूक लढवली आहे त्यामुळे त्यांचा अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे ते माळी महासंघाचे कर्मचारी आघाडीचे सोळा वर्ष प्रदेशाध्यक्ष होते आता ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रात सामाजिक स्तरावर जनसंपर्क दांडगा आहे ओबीसी संघर्ष समिती ओबीसी विध्यार्थी शिक्षक पालक विकास असोसिएशन च्या माध्यमातून ओबीसी साठी खूप काम केले आहे नुकतेच त्यांनी ओबीसीच्या भवितव्यासाठी ओबीसी जनगणना हे पुस्तक काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीवजी सातव यांचे हस्ते प्रकाशित केले आहे त्यांनी यासाठी काँग्रेस कडे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी अर्ज केला आहे काँग्रेस ने त्यांना जर नियुक्त केले तर माळी समाज ओबीसी समाज व शिक्षक काँग्रेस पक्षाला जोडला जाइल व काँग्रेस ची खान्देशात निश्चितच ताकत वाढल्या शिवाय राहणार नाही पण सद्यस्थितीत खान्देशात राष्ट्रवादी जोरात आणि काँग्रेस कोमात अशी स्थिती असल्याची चर्चा लोकांमध्ये दिसून येत आहे.

लेखक
ईश्वर आर.महाजन पत्रकार
राज्यकार्यकारणी सदस्य
महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई
9860352960,9766939950

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button