Mumbai

माजी महसूल मंत्री खडसेंना ईडी चा दणका..! 5 कोटी 73 लाखांची मालमत्ता ई डीने केली जप्त..!शेवटी ई डी नेच लावली सिडी…!

माजी महसूल मंत्री खडसेंची 5 कोटी 73 लाखांची मालमत्ता ई डी कडून जप्त..!शेवटी ई डी नेच लावली सिडी…!

मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. खडसे यांची लोणावळा, व जळगाव येथील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी मधला सव्‍‌र्हे क्र. 52/2 (अ) ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी या मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंदही केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि उकानींच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबिय सरकारनोंदी कागदोपत्री मालक झाले आहेत. मात्र या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button