Manmad

खा.डॉ.भारती पवार यांनी मालेगाव येथे घेतला विविध विभागांचा आढावा

खा.डॉ.भारती पवार यांनी मालेगाव येथे घेतला विविध विभागांचा आढावा

आप्पा बिदरी

कोरोना विषाणू आपत्ती काळात लॉकडाऊनमुळे नागरिकांना येणाऱ्या समस्या व त्यावर काय काय उपाययोजना करण्यात आल्या याचा दिंडोरी लोकसभा मतदार संघात येणाऱ्या मालेगाव बाह्य निमगाव गटातील समस्यांच्या संदर्भात शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे खा.डॉ.भारती पवार यांनी आढावा बैठक घेतली.
ह्या बैठकीत प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतीमालाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कापूस खरेदी केंद्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खूप अडचणी येत असून त्यांना क्रमशीर टोकन मिळत नसल्याची महत्वाची अडचण येत आहे. तिथे कापूस खरेदीत हस्तक्षेप होत असून जवळच्याच शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली जात असल्याच्या असंख्य तक्रारी समोर आल्या आहेत. सध्या पावसाळा तोंडावर असल्याने संथ गतीने सुरु असलेली कापूस खरेदी गतीने करावी आणि क्रमवारी ठरवूनच संबधीत शेतकऱ्याला टोकन देऊन त्यांच्या कापसाची खरेदी करावी असेही खा.डॉ.भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावले.

त्याचप्रमाणे पाणीपुरवठा योजनांमध्येही अनियमितता दिसून येत आहे. नवीन विहिरीचेही पाहिजे तेवढ्या प्रमाणात काम सुरु नाही. विहीर अनुदान योजने अंतर्गतही 500 मीटरच्या नियमात जास्त विहिरी बसू शकत नसल्याने शेतकऱ्यांना विहीर मंजूर करतांना अडचणी येत आहेत. प्रशासनाने डार्क झोनचेही पुनश्च एकदा सर्वेक्षण करून त्यात बसणाऱ्या शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी परवानगी देण्यात यावी. सध्या रब्बी हंगामातील मक्याची खरेदी सुरु असून त्यात खरीप हंगामातील मका खरेदी करावी.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मोफत तांदूळ वाटप झाले की नाही, पी एम .किसान योजना व जनधन योजनेचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले की नाही तसेच उज्वला गॅस योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचली की नाही याचाही आढावा ह्या प्रसंगी खा.डॉ.भारती पवार यांनी घेतला.

निमगाव गटातील आरोग्य यंत्रणेचाही आढावा ह्या प्रसंगी घेतला. त्यानंतर मालेगाव येथील भाजपा नेते सुनील गायकवाड यांच्या एकता मित्र मंडळाच्या कार्यालयात भेट दिली. ह्या मित्रमंडळातर्फे मालेगाव लगतच्या सर्व गावांमध्ये अर्सेनिक 30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच गरजूंना भाजीपाल्याचेही मोफत वाटप करण्यात येत आहे. ह्या समाजउपयोगी कार्यक्रमाचे ही खा.डॉ. भारती पवार यांनी कौतुक केले. ह्यानंतर कौळाणे गावातही ताईंनी भेट देऊन तिथे मास्क, फेस शिल्ड , अर्सेनिक 30 या होमिपॅथीच्या गोळ्यांचेही वितरण करण्यात आले. कौळाणेगाव व परिसरातील संपूर्ण गावांचे निर्जंतुकीकरणासाठी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य विकी खैरनार यांनी आपला ट्रॅक्टर व फवारणी यंत्र उपलब्ध करून दिले होते त्याचेही उदघाटन खा.डॉ.भारती पवार यांनी केले.

सदर आढावा बैठकी प्रसंगी प्रांताधिकारी शर्मा, तहसीलदार राजपूत, बी.डी.ओ.देवरे, ए.आर.बलदाडे, कळवण प्रांताधिकारी व मालेगाव शहर कोरोना आपदा साठी विशेष नियुक्त कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलीसनिरीक्षक नरेंद्र भदाणे, आरोग्य अधिकारी डॉ .शैलेश निकम , कृषी अधिकारी पवार त्याचबरोबर मालेगाव भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेशनाना निकम ,भाजपा नेते सुनील आबा गायकवाड, महाराष्ट्र भाजपा प्रांतिक सदस्य नितीन पोफळे ,भाजपा निमगाव मंडल अध्यक्ष दीपक देसले , भाजपा मालेगाव मंडळ अध्यक्ष मदन गायकवाड , जेष्ठ नेते हरिप्रसाद गुप्ता , भाजपा नेते जि .प .सदस्य लकी आबा गिल , जि .प .सदस्य संजय निकम , पं .स .सदस्य अरुण माउली , पं.स.सदस्य विकी खैरनार, शिवाजीराव कराडे, निमगाव मंडल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश काळे, मालेगाव मंडल युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय पवार, नगरसेवक भरत बागुल ,नगरसेवक निलेश साबने ,नगरसेवक राजेंद्र शेलार ,नगरसेवक शिंदे , विवेक वारूळे ,सलीम पिंजारी ,डॉ .मनोज हिरे .काकाजी पवार ,मुकेश झुनझुनवाला ,पप्पू पाटील ,बच्छाव गुरुजी ,प्रसाद पेठकर, पंचायत समिती सदस्य विकी खैरनार, टूनम गायकवाड, जगन्नाथ बच्छाव गुरुजी, कौळाणे सरपंच लताबाई बच्छाव, वऱ्हाने सरपंच संगीता पवार ,रमेश बच्छाव पंकज गायकवाड, देवराम रौंदळ, कौतिक बच्छाव, वाल्मीक निकम, गोपीचंद ह्याळिज, योगेश निकम, प्रकाश गोसावी, प्रकाश बच्छाव, राजेंद्र बच्छाव, समाधान सूर्यवंशी, कैलास खैरनार, योगेश बच्छाव, निर्मला गोसावी, सुरेखा निकम, मंगला वाघ आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button