Amalner

Amalner: खा शि ची निवडणूक रद्द..!अरेरे..! बिचारे…!खा शि निवडणूकीमुळे काही “पोटार्थींच्या” पोटावर पाय..!

खा शि ची निवडणूक रद्द..!अरेरे..! बिचारे…!खा शि निवडणूकीमुळे काही “पोटार्थींच्या” पोटावर पाय..!

अमळनेर येथील बहू चर्चित खा.शि.मंडळ,अमळनेर या संस्थेची निवडणूक 23 जानेवारी 2022 रोजी होणार होती.पण कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मा.जिल्हाधिकारी जळगांव यांनी योग्य निर्णय घेत पुढील आदेशापर्यंत ही निवडणूक रद्द केली आहे.

खा शि ची निवडणूकित मतदान 23 जानेवारी 2022 व मतमोजणी दि.24/01/2022 होणार होती.पण मा.जिल्हाधिकारींच्या पुढील आदेशानुसार सदर निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

खा शि निवडणूक अनेक “अर्थाने” महत्वपूर्ण मानली जाते. ह्या निवडणुकीत अर्थ,राजकारण,समाजकारण प्रतिष्ठा आणि बरच काही “दाव”
वर लावलं जातं. शैक्षणीक हेतू वगळता ह्या निवडणुकीत सर्व हेतू साध्य होतात.पण बिचारे..जे ह्या निवडणुकीवर खऱ्या “अर्था”ने लक्ष ठेवून होते त्यांची जाम निराशा झाली आहे. आशिर्वाद हे सत्तेत असलेलं आणि त्यातून फुटून किंवा नाराज सदस्य आणि नवीन सदस्य असे एकत्रित सहकार पॅनल असे दोन गट रिंगणात होते तर काही उमेदवार हे स्वतंत्र निवडणूक लढवणार होते.गेल्या एक महिन्या पासून घेत असलेल्या सर्व अर्थपूर्ण “मेहनती”वर सर्रास पाणी फिरले आहे.अनेक जण आस लावून बसले होते पण शनी का फेरा और मनी की माया आजतक किसीको समझ आयी नहीं और इससे छूटकारा भी नहीं पा सकते.. तो भैय्या..बात ये हो गयी की ..खूप दिवसांपासून काही “पोटार्थी” “बिचारे” ह्या निवडणुकीवर अर्थ पूर्ण लक्ष ठेवून होते त्यांची घोर निराशा झाली आहे. उलट सुलट पेन हातात धरून “अर्थ” “हीन” की “पूर्ण” शाई भरली होती..कोणी पेनात शाई भरली ते काय लोक बोलत नाही पण अचानक उठलेलं हे खा शि वादळ मात्र आता पुरत तरी शांत झालं आहे. अशी चर्चा गावात जोरदार पणे सुरू आहे.पण सत्ता धारी पॅनल चा सध्या तरी जोरदारपणे विजय झाला आहे कारण त्यांना ही निवडणूक आता घ्यायचीच नव्हती. आणि कोरोना त्यांच्या मदतीला धावून आला आहे.एव्हढं मात्र नक्की की खा शि निवडणुकी मुळे काही दिवस तरी अमळनेर जागं झालं होतं.चांगलीच खळबळ माजली होती.अनेक पोटार्थी शिलेदार तयार झाले होते आखड्यातील पाहिलवानांना माती लावायला पण हे सगळं रद्द झालं ना राव..अशी चर्चा अमळनेर तालुक्यात जोरदार सुरू आहे.. असो चर्चा तर होणारच..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button