Madha

केंद्र उपळाई बु।। ता. माढा तंबाखू मुक्त केंद्र म्हणून घोषित.

केंद्र उपळाई बु।। ता. माढा तंबाखू मुक्त केंद्र म्हणून घोषित.

माढा : महाराष्ट्र शासन, सलाम मुंबई फाउंडेशन, जिल्हा परिषद सोलापूर, व सारथी युथ फाऊंडेशन यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या तंबाखू मुक्त शाळा या अभियानांतर्गत उपळाई बु।। ता.माढा केंद्रातील सर्व २१ शाळांनी परिपत्रकानुसार सर्व नऊ निकष पूर्ण करून त्याची यशस्वी रित्या अंमलबजावणी केली आहे. या सर्व शाळांना सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने तंबाखू मुक्त शाळा चे प्रमाणपत्र मिळाली आहेत.
सद्या समाजात कॅन्सर व इतर अनेक रोग व्याधी, तंबाखु चे सेवन केल्याने होत आहेत. काहींना जीव गमवावे लागत आहेत. यामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त होताना दिसतात. उपचारासाठी पैसे नसतात. कुटुंबाची वाताहात होते. तंबाखू चे व्यसन हे समाजाला लागलेली कीड आहे. याला वेळी च रोखले नाही तर समाजाला भयंकर परिस्थिती ला सामोरे जावे लागेल. हे सर्व दुष्परिणाम ओळखून उपळाई बु केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थी, शाळां व्यवस्थापन समिती, पालक, लोकप्रतिनिधी मोठे कष्ट व मेहनत घेऊन आपल्या शाळा तंबाखू मुक्त शाळा केल्या. शाळेतील विद्यार्थी हा उद्याच्या उज्वल भारताचा नागरिक आहे. तो निरोगी व निर्व्यसनी राहायला हवा. असा उद्देश केंद्र प्रमुख दिगंबर काळे, मुख्याध्यापक, शिक्षकांनी ठेऊन आपले कार्य जोमाने व प्रामाणिकपणे करत आहेत.
तंबाखू मुक्त झालेल्या शाळा
जि. प.प्रा.शाळा उपळाई खु।।, जि. प.प्रा.शाळा बोकरदर वाडी, जि. प.प्रा.शाळा एडकेरजपुतवस्ती, जि. प.प्रा.शाळा केदारवस्ती, जि. प.प्रा.शाळा मोहितेवस्ती, जि. प.प्रा.शाळा कचरेवस्ती, जि. प. प्रा.शाळा मसोबवाडी, जि. प.प्रा.शाळा चव्हाणवस्ती, जि. प.प्रा.शाळा रोपळे खु, ।। जि. प.प्रा.शाळा बेडगेवस्ती, जि. प.प्रा.शाळा वडाचीवाडी, जि. प.प्रा.शाळा बाबरवस्ती, जि. प.प्रा.शाळा उपळाई बु, जि. प.प्रा.शाळा गुंडवस्ती,
नंदिकेश्वर विद्यालय उपळाई, छत्रपती विद्यालय वडाचीवाडी, महाराणी लक्ष्मीबाई कन्याप्रशाला उपळाई, न्यू इंग्लिश स्कूल, विष्णुपंत पाटील प्रशाला उपळाई, शांतीविनायक महाविद्यालय उपळाई, यशवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल उपळाई
याकामी उपळाई बु केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे, सुमभंगी लाड म्याडम, रामचंद्र वाघमारे, मंजुनाथ फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक सर्व स्तरांतून होत आहे.

Leave a Reply

Back to top button