Nashik

कविता शिंदे यांना राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक पुरस्कार प्रदान!

कविता शिंदे यांना राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक पुरस्कार प्रदान!

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : द्राक्ष विज्ञान मंडळ व कृषीथॉन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे देण्यात येणारा राज्यस्तरीय महिला द्राक्ष उत्पादक गौरव पुरस्कार आडगाव येथील प्रगतीशील महिला शेतकरी कविता बाळासाहेब शिंदे यांना देऊन सन्मानित करण्यात आले .पिंपळगाव बसवत सरपंच अलका बनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जाहीर गौरव सोहळ्याप्रसंगी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कविता शिंदे या द्राक्ष शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत एक मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या तरुण महिला शेतकरी आहे .द्राक्ष शेतीबरोबरच भाजीपाला व वाल भाजी उत्पादन घेण्यात त्या नेहमी अग्रेसर असतात .या कार्यक्रमाप्रसंगी मा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ भारती ताई पवार,पिंपळगावच्या सरपंच अलका बनकर, आ सौ सरोज अहिरे,आ सौ सीमा हिरे,
पंचायत समिती सभापती सौ विजया कांडेकर , कॅनबायोसिसच्या कार्यकारी संचालक संदीपा कानिटकर कम्युनिटी हेल्थ फाउंडेशन च्या संचालिका अश्विनी न्याहारकर आदींसह परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते
कार्यक्रमाच् प्रास्ताविक द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिक चे अध्यक्ष डॉ वसंत ढिकले ह्यांनी केले व सुत्रसंचलन कु शुभश्री ढिकले हिने केले तर आभार प्रदर्शन सौ योगिता जाधव ह्यांनी केले!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button