sawada

सावदा येथे प्लास्टिक बंदी कागदांवर : प्रशासकीय अधिकारी तथा प्रांत फैजपूर लक्ष देतील का?

सावदा येथे प्लास्टिक बंदी कागदांवर : प्रशासकीय अधिकारी तथा प्रांत फैजपूर लक्ष देतील का?

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपरिषदेत गेल्या ८ दिवसांपूर्वी शहरातील विविध दुकानदार व व्यवसायीकांची बैठक घेण्यात आली होती.यात नियमानुसार प्लास्टिक बंदी संदर्भात सुचना देण्यात आल्या. मात्र याचे फारसे परिणाम होतांना दिसून येते नाही.सर्रास प्लास्टिक विक्रीचा कारभार सुरू असून प्लास्टिक पिशव्याचा वापर शहरात होतांना दिसून येते.प्लास्टीक बंदी बाबत संबधित न.पा.प्रशासना तर्फे वृत्त पत्रात जाहिराती सुद्धा प्रकाशित केलेल्या गेल्या मात्र यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणी व जन जागृती करण्यात पालिका कमकुवत दिसून येण्या मागील कारण अजूनही कडत नाही.गेल्या ८ दिवसात शहरात पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथक कडून कोणतीच कारवाई तर सोडा पथक शहरात फिरत असल्याचेही दिसून आले नाही.यावरून प्लास्टिक बंदीचा कार्यक्रम फक्त कागदावरच पालिका प्रशासन कडून राबविण्यात येत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून शहरात प्रत्येक गल्लीबोळा व गटारी मध्ये इतर घान कचऱ्याच्या तुलनेत विविध रंगाच्या प्लास्टिक पिशव्याचे प्रमाण अधिक आहे.यामुळे थेट स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत असून प्लास्टिक बंदी नियमांची देखील सोयीस्कररित्या पायमल्ली होत आहे.तरी यास कारणीभूत पालिकेचे संबंधित अधिकारी यांचावर ठपका ठेवून सावदा पालिकेवर नियुक्त प्रशासकीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी कैलास कडलक व मुख्याधिकारी किशोर चव्हाण हे तत्परतेने योग्यती दखल घेऊन कारवाई करुन प्लास्टिक बंदी बाबत कठोर अंमलबजावणी साठी ठोस उपाय योजना करतील अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button