Pandharpur

कौठाळी च्या संग्राम ढाणे-पाटील परिवाराने त्या कन्येचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत केला साजरा

कौठाळी च्या संग्राम ढाणे-पाटील परिवाराने त्या कन्येचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत केला साजरा

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार संग्राम ढाणे पाटील यांच्या मुलीचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. मुलीचा जन्म दिवस ही त्यांनी मोठ्या दिमाखात मुलीची वरात काढून लक्ष्मी पावलाने मुलीचा घरात प्रवेश करून संपूर्ण गावाला स्नेहभोजन देऊन साजरा केला होता.
ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा मुलगी जन्माला आली तर तिला नकोशी वागणूक दिली जाते मात्र याच ग्रामीण भागात मुलगी आणि मुलगा यांच्यात भेदभाव होऊ नये हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मुलीचा जन्म दिवस हि मोठ्या उत्साहात साजरा केला होता आणि आज प्रथम वाढदिवस ही त्याच पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करण्यात आला.त्यांच्या आराध्या या कन्येचा प्रथम वाढदिवस आज समाजासाठी चांगले कार्य करत करण्यात आला. पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात आणि रायगड भवन च्या नजीक तहसीलदार सुशील बेल्हेकर,मुलीचे वडील प्रगतशील डाळिंब बागायतदार संग्राम ढाणे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे, पांडुरंग ढाणे पाटील, बाळासाहेब नागटिळक, सुरज पाटील, गणेश कोलगे व सोमनाथ लोहार या मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते विविध प्रकारच्या फुलांची व उपयोगी झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.घरामध्ये आराध्याचा साधेपणाने वाढदिवस साजरा केला मात्र समाजासाठी एक वेगळा आदर्श व्हावा याकरिता कौठाळी गावातील गरजू व गरीब घरातील पाच लहान मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून बँकत खाते उघडून मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत बँकेच्या नियमानुसार वर्षाला भरावयाचा जो निधी असेल तो सर्व निधी संग्राम ढाणे पाटील हे परिवाराच्यावतीने भरणार असून या योजनेच्या माध्यमातून मुलीला विमा कवच चाही लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालवी या संस्थेतील लहान मुलांसाठी फळांचे वाटप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व परिवारातील व्यक्तींसोबत करण्यात आले. मुलीच्या वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत समाजहिताचे कार्य करून समाजाचे हित जोपासत समाजाची बांधिलकीची जाणीव ठेवून आज आराध्याचा पहिला वाढदिवस वृक्षारोपण लहान मुलांना खाऊ वाटप आणि शासनाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ गावातील गरीब कुटुंबातील पाच मुलींना देऊन एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक तर होतच आहे परंतु अशाच प्रकारचे कार्य इतरांनीही करावे अशी प्रतिक्रिया यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button