Dindori

कर्मवीर डॉ वसंतराव पवार अष्टपैलू व्यक्तिमत्व – प्राचार्य आर सी वडजे

कर्मवीर डॉ वसंतराव पवार अष्टपैलू व्यक्तिमत्व – प्राचार्य आर सी वडजे

सुनिल घुमरे नाशिक

दिंडोरी : कर्मवीर डॉ वसंतराव पवार यांचे कार्य राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, वैधकीय, या सर्वच क्षेत्रात सर्वांसाठी प्रेरणादायी असून ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपण कामकाज करत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य आर सी वडजे यांनी केले.
जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दिंडोरी विद्यालयात कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून वडजे बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती एस एम वीरकर यांनी केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.सी वडजे, उपप्राचार्य यु डी भरसट ,पर्यवेक्षक यु डी बसते, जी व्ही आंबोरे ,श्रीमती एन पी बागुल यांच्या शुभहस्ते डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
उपशिक्षिका श्रीमती सुवर्णा बोरस्ते यांनी डॉक्टर वसंतराव पवार यांचे बालपण जीवन कार्य वैद्यकीय राजकीय व संस्था क्षेत्रातील कार्य याबद्दल माहिती सांगून कर्मवीर डॉक्टर वसंत पवार यांच्या सर्व स्मृतींना उजाळा दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य आर.सी. वडजे यांनी पुढे बोलताना डॉक्टर वसंतराव पवार एक चैतन्य यात्री राजकीय सामाजिक व शैक्षणिक साहित्य, सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याचे योगदान या विषयी माहिती विषद करून, वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे उभारणी करून सर्व पंचक्रोशीतील लोकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी यथोचित प्रयत्न केले. शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता या मूल्यांवर आधारित संस्थेचा नावलौकिक व वैद्यकीय क्षेत्रात भरघोस कामगिरी करून रक्तदान करून सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केला.या कार्यामुळे त्यांना बी.सी रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असेन मी नसेन मी कार्यातून दिसेन मी याप्रमाणे डॉक्टर वसंतराव पवार यांच्या विविध कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमास श्रीम पी ई मापारी श्रीमती ए डी जाधव, श्रीम के एस निफाडे, आदी शिक्षक प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी किरण जाधव,दिपक जाधव , तानाजी भोज आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार श्रीमती सुमन वीरकर यांनी मानले.
फोटो- दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर डॉ वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन प्रसंगी प्राचार्य आर सी वडजे, उपप्राचार्य यु डी भरसठ, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button